Motorola One Fusion Plus भारतात सादर : उत्तम फीचर्स व किंमतही कमी!

Motorola One Fusion Plus

मोटोरोलाने आज त्यांचा नवा स्मार्टफोन सादर केला असून यामध्ये उत्तम फीचर्स आणि किंमतसुद्धा मध्यम ठेवण्यात आली आहे. यामध्ये 64MP Quad कॅमेरा असून पॉपअप सेल्फी कॅमेरा, Snapdragon 730G हा प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी आहे. सोबत 18W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग आहे. या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे जे मेमरी कार्ड वापरुन 1TB पर्यंत वाढवून वापरता येईल! याची किंमत १६९९९ असून हा २४ जूनपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होत आहे.

आपणास ठाऊक नसेल तर मोटोरोलाचीही मालकी आता लेनेवो या चीनी कंपनीकडे आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली चीनी वस्तूंविरोधात असलेली मोहीम या फोन्सच्या विक्रीवर किती परिणाम करेल हे येत्या काळात समजेल.

Motorola One Fusion Plus

डिस्प्ले : 6.5” Total Vision FHD+ (2340×1080) | 395 ppi IPS TFT LCD
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 730G
GPU : Adreno 618
रॅम : 6GB LPDDR4x
स्टोरेज : 128GB + Expandable upto 1TB
कॅमेरा : 64MP Quad Camera + 8MP Ultrawide + 5MP Macro lens + 2MP Depth Sensor
फ्रंट कॅमेरा : 16MP (4MP Quad Pixel)
बॅटरी : 5000mAh 18W TurboPower Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac, Bluetooth 5.1, Fingerprint Scanner, 2 SIM Slot + 1 MicroSD Slot, Dolby Atmos, 3.5 mm headset jack, HiFi Speaker
सेन्सर्स : GPS / Glonass / Beidou / NavIC, Magnetic induction sensor / Light sensor / Proximity sensor / Gyro-meter / Acceleration sensor
रंग : Moonlight White, Twilight Blue
किंमत : हा फोन २४ जून दुपारी १२ पासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होत आहे.
6GB+128GB ₹16999


Exit mobile version