एसुसचा ROG Phone 3 सादर : गेमिंगसाठी सर्वोत्तम : 144Hz डिस्प्लेसह!

एसुसने आज त्यांच्या ROG या प्रसिद्ध गेमिंग फोन मालिकेत नवा फोन सादर केला असून हा आता जगातला सर्वात ताकदवान गेमिंग फोन आहे. यामध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट Snapdragon 865+ प्रोसेसर आहे. सोबत 144Hz डिस्प्ले, मोठी 6000mAh बॅटरी आणि 64MP ट्रिपल कॅमेरा अशा सर्वोत्तम सोयी देण्यात आल्या आहेत ज्या गेमिंगसाठी उपयोगी पडतील.

एसुस ROG 1 आणि ROG 2 नंतर आता हा ROG Phone 3 मोबाइल गेमर्सना सर्वोत्तम गेमिंग अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. गेमिंगसाठी लागणारी किंवा गेमिंगचा पुरेपूर अनुभव देणारी प्रत्येक गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल! पॉवरफुल प्रोसेसर, भरपूर रॅम, फोन गरम होऊ नये म्हणून देण्यात आलेल्या विविध सुविधा यामुळे हा फोन नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरतोय! AeroActive Cooler II द्वारे गेमिंगवेळी फोन अधिकाधिक थंड ठेवण्यास मदत होते. चार्जिंगसाठी याला फोनच्या बाजूलासुद्धा पोर्ट्स आहेत ज्यामुळे गेमिंग दरम्यान चार्जिंग केबलची अडचण होत नाही. यासोबत एक्सटर्नल डिस्प्ले, हेडफोन, गेमिंग कंट्रोलर अशी वेगवेगळी उपकरणे सुद्धा उपलब्ध करून दिली आहेत.

या फोनच्या मागे असणारा ROG लोगो हा एसुस Aura Sync आधारित असल्यामुळे याचे RGB रंग पूर्णपणे नियंत्रित करता येतात! शिवाय कॉल्स, मेसेज नोटिफिकेशनसाठी यांचा वापर करता येतो! ऑडिओसाठीसुद्धा बरंच तंत्रज्ञान वापरण्यात आलं असून DTS Sound, Dual Amplifiers, 7.1 Surround Sound, Quad Mics चा वापर केलेला आहे!

डिस्प्ले : 6.59″ Ultra Smooth 144Hz 10bit HDR10+ Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 865+
GPU : Adreno 650
रॅम : 8GB/12GB LPDDR5
स्टोरेज : 128GB/256GB UFS 3.1
कॅमेरा : 64MP Triple Camera Sony IMX686 + 13MP Ultrawide + 5MP Macro Lens
फ्रंट कॅमेरा : 24MP
बॅटरी : 6000mAh 30W Fast Charge, Quick Charge 4.0, Reverse charging 10W
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10 ROG UI
इतर : 802.11a/b/g/n/ac, Bluetooth 5.1, WiFi 6
सेन्सर्स : Fingerprint (under display, optical), accelerometer, gyro, proximity, compass
किंमत : हा फोन ६ ऑगस्ट पासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होत आहे.
8GB+128GB ₹49,999
12GB+256GB ₹57,999

Exit mobile version