धूमकेतू उघड्या डोळ्यांनी पाहण्याची दुर्मिळ संधी : जाणून घ्या कसा पाहायचा

Neowise comet in India

अनेक वर्षांनी उघड्या डोळ्यांनी पाहता येईल असा धूमकेतू पृथ्वीजवळ दिसून येत आहे. १४ जुलैपासून पृथ्वीवर वेगवेगळ्या देशात हा दिसण्यास सुरुवात झाली असून आता भारतातसुद्धा दिसू शकतो. १४ जुलैपासून रोज २० दिवस हा वायव्य दिशेला सूर्यास्तानंतर पाऊण-एक तासाने दिसू शकतो

धूमकेतू म्हणजे काय ?

धूमकेतू हे आपल्या सौरमालिकेचेच भाग असतात जे धूळ दगड आणि बर्फ यांच्या मिश्रणातून तयार होतात. यांची लांबी काही किलोमीटर्स पर्यंत असते तर हे जेव्हा सूर्याजवळ पोहोचतात तेव्हा गरम होऊन/जळून यांच्यामधून वायु आणि धूळ बाहेर पडू लागतात आणि मग यांच्यामागे धूराचं शेपूट असल्या सारखं दिसू लागतं. हे शेपूट लाखो किलोमीटर्सचंही असू शकतं!

अवकाशात आता दिसत असलेला नियोवाईज (Neowise) धूमकेतूचा २७ मार्च २०२० रोजी शोध लागला असून Near-Earth Object WISE (NEOWISE) या नासाच्या टेलिस्कोप दुर्बिणीद्वारे हा शोधण्यात आला आहे. याचं तांत्रिक नाव C/2020 F3 असं आहे.

१९९७ मध्ये दिसलेल्या Hale–Bopp धुमकेतू नंतर नियोवाईज सर्वात प्रखर आणि स्पष्ट पणे दिसेल असा धूमकेतू आहे. नियोवाईज पृथ्वीवरून यानंतर तब्बल ६८०० वर्षांनीच दिसणार आहे!

हा धूमकेतू कसा पहायचा?

यासाठी आपण SkySafari नावाचं मोफत ॲप वापरणार आहोत. तुमच्या फोनची लोकेशन ऑन करा. हे ॲप डाउनलोड करा. जवळपास सायंकाळी ७ ते आठ दरम्यान या ॲपद्वारे लक्ष ठेऊन पहा.

Download SkySafari on Google Play : https://play.google.com/store/apps/details?id=com.simulationcurriculum.skysafari5
Download SkySafari on App Store : https://apps.apple.com/us/app/skysafari/id1257281849

या लेखासाठी वर वापरण्यात आलेला फोटो Firgun Shoja (@livefirgun) या इंस्टाग्राम यूजरच्या अकाऊंटवरून घेण्यात आला आहे. त्यांनी हिमाचल प्रदेशातून हा फोटो टिपला आहे.

Search Terms : How to see neowise comet? Free app to locate neowise in india neowise comet india timing

Exit mobile version