सॅमसंगचा नवा स्वस्त फोन : Galaxy M01 Core : किंमत ५४९९

सॅमसंगने त्यांच्या M Series फोन्समध्ये काल आणखी एक फोन सादर केला असून हा यामधील आजवरचा सर्वात स्वस्त फोन असेल. M01 आणि M01s नंतर आता Galaxy M01 Core आला असून याची किंमत फक्त ५४९९ इतकी आहे! यामध्ये 5.3″ HD+ TFT डिस्प्ले आहे. MediaTek MT6739 प्रोसेसर आहे जो चक्क २०१७ मध्ये सादर झाला होता! यामध्ये 1GB+16GB आणि 2GB+32GB असे दोन पर्याय उपलब्ध असतील.

Galaxy M01 Core मध्ये 8MP कॅमेरा असून फ्रंट कॅमेरा 5MP आहे. यामधील बॅटरी 3000mAh असून सॅमसंगने ११ तासांचा बॅकअप मिळेल असं सांगितलं आहे! या फोनमध्ये अँड्रॉइडच्या Android 10 (Go Edition) ऑपरेटिंग सिस्टमचा समावेश आहे. हा फोन Black, Blue आणि Red रंगात उपलब्ध असेल. याची किंमत ₹5499 (1GB+16GB) आणि ₹6499 (2GB+32GB) अशी आहे. हा फोन आता सॅमसंगची दुकाने, वेबसाइट आणि ऑनलाइन व ऑफलाइन स्टोअर्समध्ये २९ जुलै पासून मिळेल.

Samsung Galaxy M01 Core

डिस्प्ले : 5.3″ HD+ TFT Display
प्रोसेसर : Mediatek MT6739WW
GPU : PowerVR GE8100
रॅम : 1GB/2GB
स्टोरेज : 16GB/32GB
कॅमेरा : 8MP with flash
फ्रंट कॅमेरा : 5MP
बॅटरी : 3000mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10 Go Edition
सेन्सर्स : Accelerometer
रंग : Black, Blue आणि Red
किंमत :
₹5499 (1GB+16GB)
₹6499 (2GB+32GB)

आम्ही आधीच्या काही लेखांमध्ये बोलल्याप्रमाणे सॅमसंग अजूनही कमी किंमतीच्या फोन्ससाठी चांगले पर्याय आणत नसून अनेक ग्राहक सॅमसंगकडे वळत असतानासुद्धा असे फोन्स का आणले जात आहेत हे त्यांनाच ठाऊक… लवकरच सॅमसंगचे Note20 फोन्स सादर होणार आहेत. त्यासंबंधी ट्रेलर : https://youtu.be/3BJ7fF2aQqY

Exit mobile version