गूगल क्लासरूम आणि मीटमध्ये नव्या सोयी : आता मराठी भाषेच्या सपोर्टसह!

Google Classroom Meet

सध्याच्या काळात अनेक शाळा, कॉलेजेसनी त्यांचे ऑनलाइन क्लास सुरू केले आहेत. यासाठी प्रामुख्याने वापरला जाणारा पर्याय म्हणजे गूगल मीट. शैक्षणिक सुविधांनी युक्त अशी गूगलची Google Classroom ही सेवासुद्धा अनेक शाळांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. तर गूगलने काही दिवसांपूर्वी या गोष्टीचा आणखी चांगल्या प्रकारे वापर करता यावा यासाठी यामध्ये नव्या सोयींचा समावेश केला आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही वापरण्यास अधिक सोपं होईल.

Google Classroom : गूगल क्लासरूममध्ये आता मराठीसह दहा भाषांचा सपोर्ट जोडण्यात आला आहे. आता एकूण ५४ भाषांना गूगल तर्फे या सेवेत सपोर्ट आहे. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना मराठीतसुद्धा सहज शिकवता आणि समजावता येईल. (https://classroom.google.com)
बरेच यूजर्स या माध्यमात नव्याने आले आहेत त्यांना सोपं जावं यासाठी सहज वापरता येणाऱ्या To Do List जोडण्यात आल्या आहेत. या विजेटसमुळे विद्यार्थ्याना करावयाच्या गोष्टींची यादी दिसेल तर शिक्षकांना तपासण्यासाठीच्या गोष्टींची यादी दिसेल! Assigned, Missing व Done असे विभाग असतील ज्यामध्ये दोघेही दिलेल्या, पूर्ण केलेल्या व अपूर्ण अशा गोष्टी पाहू शकतील.

गूगल क्लासरूम जॉइन करण्यासाठी देण्यात येणाऱ्या लिंक्स शेयर करणं आता आणखी सोपं करण्यात आलं असून या Invite लिंक्स आता व्हॉट्सअॅप व टेलिग्रामसुद्धा शेयर करता येतात!

Google Meet : गूगल मीटमध्येही अनेक नवे पर्याय येत आहेत. यामुळे admin असलेल्या व्यक्तींना सहभागी होणाऱ्यावर आणखी चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येईल. खालील सोयी सप्टेंबर महिन्यात उपलब्ध होत आहेत.

अधिक माहिती : https://www.blog.google/outreach-initiatives/education/the-anywhere-school-meet-classroom-updates

Exit mobile version