LG Wing : फिरणारी स्क्रीन असलेला भन्नाट ड्युयल डिस्प्ले फोन!

एलजी कंपनीने नेहमीच्या स्मार्टफोन्स डिझाईन ऐवजी थेट फिरणारी स्क्रीन असलेला फोन सादर केला आहे. या नव्या LG Wing मध्ये दोन डिस्प्ले असून एक मुख्य डिस्प्ले आडवा फिरवून वापरता येतो. तो डिस्प्ले आडवा केल्यावर आपल्याला खाली आणखी एक छोटा डिस्प्ले दिलेला आहे! मुख्य स्क्रीनवर व्हिडिओ प्ले करत आपण दुसऱ्या डिस्प्लेवर फोन कॉल्स, मेसेजिंग असं सर्वकाही करू शकाल!

या फोनमध्ये यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ एका स्क्रीनवर आणि कमेंट्स दुसऱ्या स्क्रीनवर पाहता येतील! एका स्क्रीन मॅप सुरू करून आपण दुसऱ्या स्क्रीनवरून कॉल्स उचलू शकतो! यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करताना ड्युयल रेकॉर्डिंगचा पर्याय आहे त्यामुळे एकच वेळी फ्रंट आणि मेन कॅमेरामधून दोन व्हिडिओ रेकॉर्ड होतील आणि दोन्हीचा प्रीव्यू दोन वेगवेगळ्या स्क्रीनवर एकचवेळी पाहता येईल! या प्रकारचं डिझाईन नवं असलं आणि काहीसं विचित्र वाटत असलं तरी ड्युयल स्क्रीन डिस्प्लेसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.

मुख्य मोठी स्क्रीन 6.8″ FHD+ P-OLED डिस्प्ले असून याचा अस्पेक्ट रेशो 20.5:9 आणि रेजोल्यूशन 2460×1080 असं आहे. ही स्क्रीन नेहमी प्रमाणे उभ्या स्वरूपात असेल. फिरवल्यावर पूर्ण आडवी होईल आणि वर हा मोठा डिस्प्ले व खाली दुसरा 3.9″ G-OLED डिस्प्ले मिळेल. हा दुसरा डिस्प्ले पहिल्या मुख्य डिस्प्लेच्या खाली बसलेला असेल. एकावेळी दोन गोष्टी सहज करण्यासाठी हा फोन चांगला पर्याय आहे असं एलजीने सांगितलं आहे. हा फोन Aurora Gray व Illusion Sky या दोन रंगात उपलब्ध होत असून याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

एलजीने आता बाजारातील स्वतः स्थान गमावलेल असलं तरी अजूनही वेगळे प्रयोग करणं धाडस म्हणा किंवा वेडेपणा पण अनेक दिवसांनी काही वेगळं पाहायला मिळत आहे हे नक्की. फोल्ड होणारे फोन्स रोज नवनव्या प्रकारे येत असताना ड्युयल डिस्प्लेसाठी असंही डिझाईन असू शकेल हा एलजीचा पर्याय सांगत आहे.

LG Wing

डिस्प्ले : 6.8″ 20.5:9 FHD + POLED Rotating आणि 3.9″ 1:1.15 GOLED
प्रोसेसर : Snapdragon 765G (5G)
GPU : Adreno 620
रॅम : 8GB
स्टोरेज : 128GB
कॅमेरा : 64MP Wide + 13MP Ultrawide + 12MP Gimble Camera Ultrawide
फ्रंट कॅमेरा : 32MP Pop Up
बॅटरी : 4000mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac Bluetooth 5.1, In Display Fingerprint Scanner, NFC
नेटवर्क : 5G, 4G
सेन्सर्स : Fingerprint (under display, optical), accelerometer, gyro, proximity, compass
रंग : Aurora Gray व Illusion Sky
किंमत : अद्याप जाहीर नाही

Exit mobile version