ॲपल iPhone 12 : चार आयफोन्स सादर : आता बॉक्समध्ये चार्जर दिला जाणार नाही!

आयफोनसोबत आता बॉक्समध्ये चार्जर दिला जाणार नाही!

आज झालेल्या कार्यक्रमात ॲपलने iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max हे चार आयफोन आणि होमपॉड मिनी हा स्मार्ट स्पीकर सादर केला आहे. नव्या आयफोन्समध्ये आता 5G चा समावेश करण्यात आला असून हे 5G जगातलं सर्वात वेगवान 5G असेल असं ॲपलने सांगितलं आहे. या iPhone 12 फोन्समध्ये नवा A14 Bionic प्रोसेसर देण्यात आला असून हा फोन्समध्ये सर्वात वेगवान प्रोसेसर असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय या फोन्समध्ये आता MagSafe नावाचं तंत्रज्ञान जोडण्यात आलं असून जे मॅग्नेट म्हणजे चुंबकाचा वापर करतं. यामुळे आता फोनची केस, चार्जर, कार्ड ठेवण्यासाठी वॉलेट अशा ॲसेसरी सहज जोडता येणार आहेत!

ॲपलने आता आयफोन बॉक्समध्ये चार्जर दिला जाणार नाही असं जाहीर केलं आहे! वाचून आश्चर्य वाटलं ना? पण होय ॲपल आता त्यांच्या कंपनीमधील कार्बनचं फुटप्रिंट 0% करण्यासाठी प्रयत्न करत असून या दिशेने एक पाऊल उचलण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे त्यांच्या मते जगभरात आधीच बरेच चार्जर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे कार्बन फुट प्रिंट कमी करून निसर्ग जपण्यास मदत होईल या इच्छेने हे असं केलं जात आहे. यामुळे वार्षिक जवळपास ४,५०,००० कार्स मधून बाहेर पडतो इतका (२० लाख मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन) कार्बन फुटप्रिंट कमी करण्यास मदत होईल असं त्यांनी सांगितलं आहे! आता हा निर्णय किती योग्य किंवा अयोग्य ते तुम्ही ठरवा…!

आयफोन प्रो मॉडेल्समध्ये अधिक कॅमेरा लेन्स आणि AR साठी उपयुक्त LiDAR स्कॅनर देण्यात आला आहे. हा लो लाइट मध्ये ऑटो फोकस साठीही मदत करेल. शिवाय हे फोन 4K/60 video at 10-bit Dolby Vision HDR रेकॉर्ड करू शकतात! हे सुद्धा प्रथमच एका फोनमध्ये पाहायला मिळणार आहे!

iPhone 12 Mini मध्ये 5.4″ डिस्प्ले असेल. iPhone 12 आणि 12 Pro मध्ये 6.1″ डिस्प्ले असेल आणि iPhone 12 Pro Max मध्ये 6.7″ Super Retina XDR display असेल. या फोन्समधील मुख्य फरक हा डिस्प्ले साईज आणि कॅमेरा यामध्येच आहे.

आयफोनच्या भारतीय किंमती खालीलप्रमाणे

आयफोन १२ मिनी हा यामधील सर्वात लहान फोन असून हा जगातला सर्वात लहान 5G फोन आहे असं ॲपलने सांगितलं आहे. याची किंमत ₹69,900 पासून सुरू होईल.
आयफोन १२ हा नेहमीचा बेस मॉडेल फोन असून याची किंमत ₹79,900 पासून सुरू होईल.
आयफोन १२ प्रो हा प्रो बेस मॉडेल फोन असून याची किंमत ₹1,19,900 पासून सुरू होईल.
आयफोन १२ प्रो मॅक्स हा सर्वोत्तम मॉडेल फोन असून याची किंमत ₹1,29,900 पासून सुरू होईल.

आयफोन्सच्या मॉडेल्सची तुलना करण्यासाठी लिंक : apple.com/in/iphone/compare

Search Terms : Apple launches iPhone 12 series with 4 models iPhone 12 Price in India

Exit mobile version