गूगल फोटोजमधील फ्री अनलिमिटेड बॅकअप बंद होणार!

गूगलची गूगल फोटोज नावाची सेवा आहे ज्याद्वारे आपण आपल्या फोनमधील सर्वच्या सर्व फोटो कोणत्याही मर्यादेशिवाय अपलोड करून बॅकअप घेऊ शकता. ते सुद्धा पूर्णपणे मोफत आणि अनलिमिटेड! गूगलच्या या सेवेला लाभ अनेक जण त्यांच्या फोनमधील फोटोज, व्हिडिओजचा बॅकअप गूगलकडे घेण्यासाठी करतात. मात्र आता जून २०२१ नंतर यावर मर्यादा येणार असून यामध्ये घेतला जाणारा बॅकअपसुद्धा तुमच्या गूगल अकाऊंटसोबत मिळणाऱ्या 15GB स्टोरेजमध्येच मोजला जाणार आहे! अनेकांसाठी ही बातमी विशेष असू शकते कारण या स्टोरेजवर बरेच जण अवलंबून त्यांचे बॅकअप घेत आहेत.

गूगल फोटोजमध्ये High Quality आणि Original असे दोन पर्याय आहेत. आत्ता हाय क्वालिटी पर्यायाद्वारे अपलोड केल्यास तो फोटो किंवा व्हिडिओ compress केला जातो आणि मग अशा प्रकारे आपण अनलिमिटेड अपलोड्स करत फ्री बॅकअप घेऊ शकता (आता जून २०२१ पर्यंतच). Original पर्यायाद्वारे अपलोड केल्यास आहे असा फोटो आहे त्या साईजमध्ये अपलोड होतो त्यामुळे हा फोटो गूगल अकाऊंटच्या 15GB मध्ये मोजला जाईल.

photos.google.com/storage या लिंकवर तुम्हाला तुमच्या गूगल अकाउंटमधील स्टोरेज कशा प्रकारे वापरण्यात आलं आहे ते समजेल.

गूगल अकाऊंटसोबतचं मोफत 15GB स्टोरेज जीमेल, गूगल ड्राइव आणि आता गूगल फोटोज यांना एकत्र करणारं असेल. त्यामुळे जर तुमचा जीमेल अटॅचमेंटचा वापर जास्त असेल किंवा गूगल ड्राइव तुम्ही बऱ्याच फाइल्स ठेवल्या असतील तर गूगल फोटोजचं साठी नक्कीच जागा पुरणारी नाही. गूगलच्या म्हणण्यानुसार अनेकांची ही 15GB स्टोरेजची मर्यादा पूर्ण होत नाही म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

तुम्ही अजूनही जून २०२१ पर्यंत मोफत अनलिमिटेड बॅकअप घेऊ शकता. जून २०२१ नंतर त्यामधील डेटा डिलिट होणार नाही.

जून २०२१ नंतर अपलोड करताना जर तुमचं 15GB गूगल अकाऊंट स्टोरेज भरलं तर तुम्हाला पैसे देऊन Google One चं सदस्यत्व (Subscription) घ्यावं लागेल. ज्यानंतर तुम्हाला 15GB वर 100GB अधिकचं स्टोरेज मिळेल. गूगल वन ही गूगलची क्लाऊड स्टोरेज सेवा आहे. यामध्ये प्लॅन्सनुसार अधिक स्टोरेजसुद्धा घेता येईल. गूगल वनमध्ये स्टोरेजसोबत इतरही अनेक सोयी मिळतात.
अधिक माहिती : https://one.google.com/about

Google One India Plans

जर तुमच्याकडे गूगलचा पिक्सल फोन असेल तर तुम्हाला वरील गोष्टीबद्दल चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला आधीप्रमाणे पुढेसुद्धा मोफत अनलिमिटेड बॅकअप घेता येईल!

खरं सांगायचं तर गूगल फोटोजची ही अनलिमिटेड फ्री बॅकअपची सोय लवकर विश्वास बसणार नाही इतकी चांगली ऑफर होती. हे पुढे कधीतरी बंद होणार हे साहजिकच होतं. आता स्टोरेजची मागणी वाढत जात आहे हे पाहून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शिवाय ही नवी मर्यादा सुरू होईल तेव्हा ते एक टुल देणार आहेत ज्याद्वारे ब्लर झालेले फोटो काढून टाकता येतील जेणेकरून आपलं स्टोरेज काही प्रमाणात मोकळं होईल.

जर तुम्हाला अजूनही तुमच्याकडील सर्व फोटोज मोफत ऑनलाइन बॅकअप घेऊन ठेवायचे आहेत तर जून २०२१ पर्यंत घेऊन ठेवा

काही जणांनी सोशल मीडियावर चेष्टेत असंही म्हटलं आहे की आता गूगलकडे सर्वांच्या चेहऱ्यांचा डेटा बऱ्यापैकी गोळा झाला आहे त्यामुळे आता त्यांनी ही सेवा मोफत देणं बंद केलं आहे!

गूगलतर्फे सर्वाना पाठवण्यात आलेला ईमेल

Search Terms : Google Photos to discontinue unlimited free backups from June 2021 Suggests users to get Google One Subscription instead

Exit mobile version