वनप्लसचं स्मार्टवॉच सादर : OnePlus Watch

OnePlus Watch

वनप्लसने आता स्मार्टफोन्सनंतर त्यांचं पहिलं स्मार्ट घडयाळ OnePlus Watch सादर केलं आहे. यामध्ये स्मार्ट कनेक्टीविटी, ११० व्यायाम प्रकार, फोन कॉल्ससाठी वापर अशा सोयी आहेत. हे घडयाळ २० मिनिटांच्या चार्जवर पूर्ण आठवडाभर चालेल असं म्हणलं आहे. याची बॅटरी लाईफ २ आठवडे असेल. याची भारतातली किंमत १६,९९९ अशी ठेवण्यात आली आहे.

यामध्ये ब्लड ऑक्सिजन मोजण्याचीही सोय आहे. 5ATM IP68 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स आहे.

हे घडयाळ वनप्लस टीव्हीसोबत सुद्धा जोडलं जातं आणि त्याद्वारे आणखी सुविधा वापरता येतात. वनप्लस टीव्हीचा आवाज कमी जास्त करण्यासाठी तो टीव्ही बंद करण्यासाठी, कंटेंट ब्राऊज करण्यासाठीही वनप्लस वॉच वापरता येईल. टीव्ही पाहत असताना जर तुम्हाला कॉल आला तर आपोआप आवाज कमी केला जाईल. टीव्ही पाहत पाहत जर तुम्ही झोपी गेला तर हा काही वेळाने आपोआप टीव्ही बंद करेल.

आज हे वॉच सादर करत असतानाच वनप्लसने OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus 9R सुद्धा सादर झाले आहेत.

https://twitter.com/OnePlus_IN/status/1374375279905308677

Exit mobile version