ॲमेझॉन संस्थापक जेफ बेझोस यांचा अवकाश प्रवास यशस्वी!

ब्ल्यु ऑरिजिन (Blue Origin) या स्वतःच्या कंपनीच्या New Shepard रॉकेटमार्फत जेफ बेझोस, त्यांचा भाऊ मार्क बेझोस, ८२ वर्षीय वॉली फंक आणि १८ वर्षीय ऑलिव्हर ज्याने तिकीट घेतलं होतं अशा चौघांनी आज अंतराळ प्रवास केला आहे. यावेळी त्यांनी जवळपास १०६ किमी ऊंची गाठली होती जी काही दिवसांपूर्वी झालेल्या व्हर्जिन गॅलॅक्टिकपेक्षा १६ किमी अधिक होती. यावेळी त्यांनी जिथून अंतराळ सुरू होतं असं मानण्यात येतं अशी Karman रेषा सुद्धा ओलांडली! त्यांच्या एकूण प्रवासाची वेळ जवळपास १० मिनिटे होती.

या उड्डाणासाठी आजची तारीख निवडण्याचं कारण म्हणजे आजच्याच दिवशी १९६९ मध्ये नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ आल्ड्रिन यांच्यामार्फत चंद्रावर पहिल्यांदा मानवी पाऊल पडलं होतं!

डावीकडून Mark bezos, Jeff Bezos, Oliver Daemen आणि Wally Funk

या प्रवासात Wally Funk या ८२ वर्षीय महिला अंतराळवीराचाही समावेश होता. १९६० च्या आसपास खास महिलांसाठी अवकाश मोहीम आखण्यात आली होती. जवळपास १३ महिलांमध्ये पुरुष पार करत असलेल्या सर्व टेस्ट पूर्ण करून वॉली यांचा समावेश करण्यात आला होता मात्र नंतर ही मोहीम रद्द करण्यात याली होती. यामुळे अवकाशात जाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या वॉली यांना आज संधी मिळाली होती आणि त्यानुसार त्यांनी त्यांचा प्रवास पूर्ण सुद्धा केला आहे! या निमित्ताने त्या जगातील सर्वात वृद्ध अंतराळवीरसुद्धा ठरल्या आहेत.

जेफ बेझोस, त्यांचा भाऊ मार्क बेझोस आणि वाली फंक यांच्यासोबत एक १८ वर्षीय तरुण सुद्धा सहभागी होता. Oliver Daemen याने एका अज्ञात व्यक्तीची जागा घेत प्रवास केला. त्या अज्ञात व्यक्तीने बोलीमध्ये चक्क 28 मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास २०९ कोटी मोजून या प्रवासाचं तिकीट विकत घेतलं होतं. मात्र त्याने वेळेच्या अडचणीमुळे नंतरची तारीख निवडली ज्यामुळे ऑलिव्हरच्या वडलांनी त्यापेक्षा कमी पण जाहीर न करण्यात आलेल्या किंमतीत आजचा प्रवास केला आहे. यामुळे ऑलिव्हर त्यांचा पहिला ग्राहक ठरला शिवाय तो सर्वात तरुण अंतराळवीरसुद्धा बनला आहे!

काही दिवसांपूर्वीच व्हर्जिन या ब्रिटिश कंपनीचे प्रमुख असलेले ७० वर्षीय रिचर्ड ब्रॅन्सन यांनी व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीच्या अवकाशविमानातून प्रवास करत स्वतःच्याच स्पेसशिप मार्फत प्रवास करणारे पहिले व्यक्ती ठरण्याचा मान मिळवला होता.

अवकाश पर्यटनासाठी आता पर्याय उपलब्ध होताना दिसत असून याद्वारे तुम्ही तुमची जागा आरक्षित करून अवकाशात प्रवास करून पृथ्वीगोल पाहून Weightlessness चा अनुभव घेऊन पृथ्वीवर परत येऊ शकता.

Exit mobile version