OnePlus Nord 2 5G भारतात सादर : सोबत Buds Pro सुद्धा उपलब्ध!

काही दिवसांपूर्वी वनप्लसने त्यांच्या मध्यम किंमतीच्या नॉर्ड फोन मालिकेत Nord 2 5G सादर केला आहे. याआधी त्यांनी OnePlus Nord, OnePlus Nord CE 5G मॉडेल्स आणले आहेत. या नव्या फोनमध्ये नेहमीच्या Qualcomm प्रोसेसर ऐवजी MediaTek चा Dimensity 1200 प्रोसेसर दिला आहे. सोबत 50MP ट्रिपल कॅमेरा सेटप, 4500mAh बॅटरी, 65W Warp Charging अशा सोयी देण्यात आल्या आहेत.

OnePlus Nord 2 5G तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध होत असून 6GB+128GB ची किंमत २७९९९ असेल आणि हे मॉडेल ऑगस्ट मध्ये खरेदीला उपलब्ध होईल. 8GB+128GB मॉडेलची किंमत २९९९९ आणि 12GB+256GB मॉडेलची किंमत 34999 असणार असून हे फोन्स २८ जुलै पासून खरेदी करता येतील. हे फोन Blue Haze, Gray Sierra आणि Green Woods या रंगात उपलब्ध होतील.
अॅमेझॉन प्राइम ग्राहकांना हा फोन त्यांच्या २६ जुलै पासून सुरू होणाऱ्या प्राइम सेल मध्ये खरेदी करता येईल.

OnePlus Buds Pro हे वायरलेस इयरफोन्स 11mm dynamic drivers, Dolby Atmos Support, तीन मायक्रोफोन्स आणि खास वैशिष्ट्य असलेली नॉईस कॅन्सलेशनची सोय यामध्ये मिळेल. याच्या केससह हे इयरफोन्स ३८ तासांची बॅटरी लाइफ देतील. शिवाय १० मिनिटात फुल चार्ज सुद्धा होतात. यांची किंमत भारतात जाहीर करण्यात आलेली नाही मात्र अमेरिकेत 150 डॉलर्स म्हणजे जवळपास ११२०० रुपये इतकी किंमत जाहीर केलेली आहे.

OnePlus Nord 2 5G
Exit mobile version