सॅमसंग Galaxy Z Fold 3, Z Flip 3 सादर : सोबत Watch 4, Buds 2 सुद्धा!

सॅमसंगने काल झालेल्या Galaxy Unpacked कार्यक्रमात त्यांचे घडी घालता येणारे नवे प्रीमियम फोन्स सादर केले आहेत. Z Fold 3 हा घडी उघडून टॅब्लेट प्रमाणे वापरता येतो तर Z Flip 3 जुन्या फ्लिप फोन्सप्रमाणे घडी घालून खिशात ठेवता येतो! यांच्यासोबत स्मार्ट वॉच मालिकेतील Galaxy Watch 4 आणि Buds 2 हे वायरलेस इयरफोन्ससुद्धा यावेळी सादर करण्यात आले आहेत.

Galaxy Z Fold 3 मध्ये आता S Pen सपोर्ट देण्यात आला आहे शिवाय या जगात प्रथमच घडी घालता येणाऱ्या फोनमध्ये डिस्प्ले खाली फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे! होय चक्क स्क्रीनच्या खाली हा कॅमेरा जोडलेला आहे! यामुळे आता याची घडी उघल्यावर पूर्णपणे स्क्रीन असलेला 7.6 इंची OLED डिस्प्ले पाहायला मिळेल. यामध्ये Gorilla Glass Victus protection, 12MP+12MP+12MP असा ट्रिपल कॅमेरा सेटप, 4MP फ्रंट कॅमेरा, Snapdragon 888 प्रोसेसर, 4400mAh बॅटरी 25W फास्ट चार्जिंग, IPX8 रेटिंग, S Pen सपोर्ट, Android 11 आधारित One UI 3.1, Dual 5G अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
याची किंमत तब्बल रु १,४९,९९९ (12GB+256GB) आणि रु १,५७,९९९ (12GB+512GB) आहे!

Galaxy Z Flip 3 मध्ये आता 1.9 इंची कव्हर डिस्प्ले मिळेल जो आधीच्या मॉडेल मध्ये 1.1 इंची होता. या स्क्रीनवरून कॉलला उत्तर देणे, नोटिफिकेशन पाहणे अशा गोष्टी करता येतात. घडी उघडल्यावर दिसणारी मोठी स्क्रीन 6.7 इंची FHD+ AMOLED 120Hz डिस्प्ले असलेली असून यामध्ये Gorilla Glass Victus protection, 12MP+12MP ड्युयल कॅमेरा सेटप, 10MP फ्रंट कॅमेरा, Snapdragon 888 प्रोसेसर, 8GB रॅम, 128GB UFS 3.1 स्टोरेज, 3300mAh बॅटरी 15W फास्ट चार्जिंग, IPX8 रेटिंग, Android 11 आधारित One UI 3.1, Dual 5G मिळेल.
याची किंमत भारतात रु ८४९९९ (8Gb+128GB) आणि रु ८८९९९ (8GB+256GB) इतकी आहे.

हा फोन १७ ऑगस्ट रोजी भारतात सादर झाला असून याचं प्रिबुकिंग २४ ऑगस्ट पासून सुरू होईल. हा फोन ९ सप्टेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Exit mobile version