सॅमसंग Galaxy A52s 5G भारतात सादर! 120Hz डिस्प्ले, SD778G प्रोसेसर!

Galaxy A52s 5G

सॅमसंगने त्यांच्या A सिरीज फोन्समध्ये नवा फोन सादर केला असून नव्या Galaxy A52s 5G मध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले आणि डॉल्बी अॅटमॉस असलेले स्टीरिओ स्पीकर्स आहेत. याचा Infinity-O डिस्प्ले नक्कीच याच्या स्पर्धकांच्या तुलनेत चांगला आहे. 4,500mAh ची बॅटरी सोबत 25W फास्ट चार्जिंग देण्यात आलेलं आहे. Snapdragon 778G हा प्रोसेसर मिळेल. हा फोन Awesome Violet, Awesome Black, Awesome White या तीन रंगांमध्ये उपलब्ध होईल.

यामध्ये चार कॅमेरे देण्यात आले असून मुख्य कॅमेरा 64MP आहे सोबत 12MP अल्ट्रावाईड + 5MP डेप्थ कॅमेरा आणि 5MP मॅक्रो कॅमेरा असेल. फ्रंट कॅमेरा 32MP आहे. यामधील 5G ला १२ बॅंड्सचा सपोर्ट आहे जो चीनी कंपन्यांच्या फोन्समध्ये तुलनेने फार कमी बॅंड असलेला असतो. हा फोन IP67 रेटिंग असलेला आहे त्यामुळे यावर पाणी पडलं किंवा भिजला तरी काही होणार नाही.

या फोनची किंमत ३५९९९ (6GB+128GB) आणि ३७९९९ (8GB+128GB) अशी आहे. HDFC बँक कार्ड ग्राहकांना ३००० चा कॅशबॅक मिळेल.

डिस्प्ले : 6.5″ Super AMOLED Display 120Hz
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 778G
GPU : Adreno 642L
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB + 1TB Expandable
कॅमेरा : 64MP Quad Camera + 12MP Ultrawide +5MP Macro Lens + 5MP Depth
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 45000mAh 25W
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 11 with One UI 3
इतर : 3.5mm headphone jack, NFC, Type C Port, in-display fingerprint sensor
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Awesome Violet, Awesome Black, Awesome White
किंमत :
6GB+128GB 4G ₹ ३५९९९
8GB+128GB 4G ₹ ३७९९९

A52s 5G फोन चांगला असला तरी किंमत थोडीशी जास्त आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत प्रोसेसर व डिस्प्ले वगळता फारसा बदल करण्यात आलेला नाही. तरीही सॅमसंगचा हा फोन रियलमी, शायोमीच्या फोन्सना चांगला पर्याय आहे.

Exit mobile version