[अपडेट] तब्बल सहा तासानंतर फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सॲपच्या पुन्हा सुरू!

गेल्या जवळपास अर्ध्या तासापासून फेसबुकच्या प्रमुख सेवा फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सॲप जगभर डाऊन झाल्या आहेत म्हणजे या सेवांचा वापर करताना अडचणी येत आहेत.

विशेष म्हणजे जगभरात एकाच वेळी या सर्व सेवा बंद झाल्या आहेत. आता जवळपास पाऊण तास झाला तरी यामधील कोणतीही सेवा अद्याप सुरू झालेली नाही. काही जणांनी DNS संदर्भातील अडचणी लक्षात आणून दिल्या आहेत. फेसबुकने ते सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं ट्विट केलं आहे.

ट्विटरवर मात्र यावे धुमाकूळ चालू असून मीम्सचा नुसता पाऊस पडतोय… स्वतः ट्विटरनेसुद्धा सर्वांना हॅलो म्हणत ट्विट केलंय आणि त्यावर बऱ्याच कंपन्या आणि ब्रॅंडसनीसुद्धा ट्विटस केल्या आहेत.

अपडेट ०५-१०-२०२१ : फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार पहाटे ४ वाजल्या पासून या सर्व सेवा पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे
आणि आता सर्वाना पुन्हा या सेवा वापरता येत आहेत.

फेसबुकने याबाबत माहिती देताना असं सांगितलं आहे की configuration मधील दोषांमुळे त्यांची अंतर्गत सिस्टम आणि टूल्स यांच्यात बिघाड निर्माण झाला. ज्यामुळे या सेवा पूर्ववत करणं आणखी अवघड झालं.

DownDetector वर Snapchat, Airtel, अशा इतर वेबसाइट्स/सेवांनासुद्धा काही ठिकाणी अडचणी येत आहेत असं दाखवलं आहे! isitdownrightnow.com ही कोणत्या साईट डाऊन आहेत याची माहिती देणारी साईटसुद्धा डाऊन झाली आहे. मात्र सर्व ठिकाणी या इतर सेवा बंद असण्याची शक्यता वाटत नाही. कदाचित हा काही देशांमधील नेटवर्कचा मोठा प्रॉब्लेम झालेला असू शकतो.

downdetector साईटवरील स्टेट्स

Exit mobile version