पुण्यात होणार गूगल क्लाऊडचं नवं ऑफिस!

Google Cloud Pune

गूगलने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी ते त्यांच्या क्लाऊड संबंधित सेवांसाठी पुणे शहरात नवं कार्यालय सुरू करत आहेत. या ऑफिसमध्ये क्लाऊड टेक्नॉलॉजीवर काम करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञ लोकांची भरती केली जाणार आहे.

पुण्याचं हे नवं ऑफिस २०२२ च्या दुसऱ्या सहामाहीत सुरू होईल मात्र त्यांनी यासाठीची भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. गुरगाव, हैदराबाद आणि बेंगळुरूसोबत पुण्यातही गूगलच्या वाढत्या ग्राहकांना सेवा देता यावी या अनुषंगाने आणखी लोकांची भरती केली जात आहे.

या नव्या ठिकाणी भरती केले जाणारे गूगलर्स (गूगलमधील कर्मचारी) क्लाऊड प्रॉडक्ट इंजीनियरिंग, टेक्निकल सपोर्ट आणि ग्लोबल डिलिव्हरी सेंटर ऑर्गनायझेशन्ससाठी काम करतील.

एक आयटी हब असलेल्या पुण्यामधील आमच्या या नव्या कार्यालयाद्वारे आम्हाला टॉप टॅलेंटचा तुमच्याला प्रगत क्लाऊड कम्प्यूटिंग सोल्यूशन्स, उत्पादने आणि सेवा देण्यासाठी उपयोग करून घेता येईल असं गूगल इंडियाचे क्लाऊड इंजिनियरिंग उपप्रमुख अनिल भन्साळी यांनी सांगितलं आहे.

ज्यांना या नव्या कार्यालयामधील सेवांमध्ये सहभागी व्हायची इच्छा / काम करण्याची इच्छा आहे त्यांनी Google Careers या लिंकवर जाऊन आपल्या योग्यतेची जागा पाहून नोंदणी करावी.

Search Terms Google India to open a new Google Cloud Office in Pune

Exit mobile version