यूट्यूब प्रीमियमचा स्वस्त वार्षिक प्लॅन उपलब्ध!

यूट्यूबने त्यांच्या अॅड फ्री यूट्यूब प्रीमियम आणि यूट्यूब म्युझिकसाठी वार्षिक प्लॅन भारतात उपलब्ध करून दिला आहे. हा प्लॅन नव्या सबस्क्रायबर्ससाठी असून हा खास ऑफर अंतर्गत स्वस्तात उपलब्ध झाला आहे. ही ऑफर २३ जानेवारी २०२२ पर्यंतच उपलब्ध असेल.

या वार्षिक प्लॅनची किंमत ११५९ रुपये आहे. हा प्लॅन फक्त Individual म्हणजे वैयक्तिक यूजर्ससाठी आणि जे पहिल्यांदाच यूट्यूब प्रीमियम वापरणार आहेत त्यांच्यासाठीच उपलब्ध आहे.
फॅमिली व स्टुडंट यूजर्ससाठी नेहमीचा महिन्याचा प्लॅन सुरू असून त्यांना वार्षिक प्लॅन उपलब्ध नाही.

एरवी जर तुम्ही वैयक्तिक प्लॅन घ्यायला गेलात तर त्याची किंमत दरमहा १२९ म्हणजे वर्षाला १५४८ इतकी होते त्याऐवजी जर तुम्ही या ऑफरमध्ये प्लॅन घेतला तर तुम्हाला तो ११५९ रुपयात मिळेल म्हणजेच तुमचे ३८९ रुपये वाचतील!

आणखी एक पर्याय म्हणजे तुम्ही ३ महिन्यांची मोफत ट्रायल घेऊन उर्वरित महिने पैसे दिले तरीही ११६१ रूपयेच जातील. त्यामुळे तोसुद्धा पर्याय या वार्षिक प्लॅन इतक्याच किंमतीत उपलब्ध आहे. पण यामध्ये तुम्हाला तीन महिन्यांनंतर दरमहा १२९ रुपये द्यावे लागतील. (Recurring Payment)

यूट्यूब प्रीमियममध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ जाहिरातीशिवाय पाहणे, डाउनलोड करून ऑफलाइन पाहणे, यूट्यूब म्युझिक सेवा (सर्व गाणी) आणि बॅकग्राउंडमध्ये व्हिडिओ प्ले करता येणे अशा सुविधा मिळतात.

YouTube Premium and YouTube Music now available with a New Annual Plan with an offer in India

Exit mobile version