ॲपल मॅक स्टुडिओ जाहीर : सर्वात पॉवरफुल कॉम्प्युटर M1 Ultra प्रोसेसरसह!

ॲपलने त्यांच्या आज झालेल्या Peek Performance कार्यक्रमात त्यांचा आजवरचा सर्वात पॉवरफुल प्रोसेसर असलेला सर्वात पॉवरफुल मॅक कॉम्प्युटर सादर केला आहे! याचं नाव मॅक स्टुडिओ (Mac Studio) असं असणार आहे.

या नव्या मॅक स्टुडिओमध्ये असलेला M1 Ultra प्रोसेसर M1, M1 Pro आणि M1 Max पेक्षा शक्तिशाली असून यामुळेच या मॅक स्टुडिओला त्यांनी त्यांचा आजवरचा सर्वात पॉवरफुल मॅक म्हटलं आहे. हा प्रोसेसर, SSD, स्टोरेज, मेमरी बॅंडविड्थ, Thunderbolt Port, इंटरनेट अशा सर्वच बाबतीत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरला बरंच मागे टाकत त्यांच्या तुलनेत अवघ्या काही सेकंदात व्हिडिओ एक्सपोर्ट, 3D Rendering पूर्ण करतोय!

याचा M1 Max प्रोसेसर तब्बल 20 Core पर्यंतच्या पर्यायामध्ये मिळणार आहे आणि तरीही हा 28 Core असलेल्या मॅक प्रोपेक्षा ८० टक्के अधिक वेगवान असणार आहे! ज्या M1 मुळे लॅपटॉप्स व कॉम्प्युटरमधलं विश्व बदललं आहे त्याच्या आठपट कामगिरी हा M1 Max करू शकतो!

या मॅक स्टुडिओ with M1 Ultra ची भारतातली किंमत ३,८९,९०० रुपये इतकी आहे. मॅक स्टुडिओमधील सर्व पर्याय जर त्याच्या उपलब्ध पर्यायातील सर्वोत्तम पर्याय (8TB SSD, 128GB रॅम, 64 Core GPU) तर त्याची किंमत ७,८९,९०० इतकी होते!

यासोबत ॲपलने स्टुडिओ डिस्प्ले सुद्धा सादर केला असून यामध्ये तब्बल २७” 5K डिस्प्ले देण्यात आला आहे. हा तांत्रिकदृष्ट्या एक मॉनिटर असला तरी यामध्ये A13 Bionic प्रोसेसर, 12MP Ultrawide Camera, 3 mic, 6 Speakers, 3 USB C Ports आणि एक Thunderbolt पोर्ट देण्यात आलं आहे! यामध्ये तब्बल 1 Billion रंग, 600nits Brightness, P3 Wide Color Gamut मिळेल!

या Apple Studio Display किंमत भारतातली किंमत १,५९,९०० रुपये इतकी असणार आहे.

https://youtu.be/yvX1WkFFtQI
Exit mobile version