VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

जवळपास प्रत्येक विंडोज लॅपटॉप/पीसीवर इंस्टॉल केल्या जाणाऱ्या VLC Media Player वर भारत सरकारतर्फे दोन-तीन महिन्यांपासून बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या वेबसाइटवर गेल्यास ती वेबसाइट {videolan.org) इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या आयटी अॅक्ट अंतर्गत ब्लॉक करण्यात आली आहे अशी नोटिस दिसते!

Videolan या VLC च्या डेव्हलपर्सच्या म्हणण्यानुसार १३ फेब्रुवारीपासून त्यांची वेबसाइट ब्लॉक करण्यात आली आहे. त्यामुळे या मीडिया प्लेयरची विंडोज आवृत्ती डाउनलोड करता येत नाही. सरकारमधील संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार या VLC मधील काही त्रुटींमुळे Cicada नावाचा चीनी हॅकर्स ग्रुप याचा वापर करून वेगवेगळ्या देशांमधील युजर्सची माहिती चोरत आहे.

प्रत्यक्षात VLC मध्ये तशा कोणत्याही त्रुटी नसल्याचं Videolan डेव्हलपर्सनी सांगितलं आहे. शिवाय सरकारनेही अद्याप नेमकी का बंदी घालण्यात आली आहे याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. VLC सारखा Open Source सॉफ्टवेअर केवळ त्याचा वापर अशा गोष्टीसाठी केला जातो म्हणून आलेल्या बातम्यांच्या आधारे थेट सॉफ्टवेअरवरच बंदी घालण्यात आली आहे. अनेकांचं याबाबत असंही म्हणणं आहे की या तर्कानुसार तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर पण बंदी घालायला हवी!

आमचंही वैयक्तिक मत असं आहे का ओपन सोर्स सॉफ्टवेअर मध्ये खरंच काही त्रुटी असेल तर त्यांनी तसं निदर्शनास आणून द्यावं अन्यथा त्यांच्यावर विनाकारण बंदी घालण्यात काहीच अर्थ नाही. आपण सर्वजण हे सॉफ्टवेअर वर्षानुवर्षं वापरत आलेलो आहोतच.

Videolan नेही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून तुम्ही भारतीय युजर्स असाल तर आम्हाला मदत करा आणि तुमच्या सरकारला ही चूक निदर्शनास आणून द्या असं आवाहन केलं आहे. सध्या सरसकट सर्वच ISP वर हा ब्लॉक केलेला दिसत नाही. काही ठराविक ISP वर ब्लॉक केल्याची नोटिस दिसत आहे. उदा. Airtel, Vi, Jio

VLC चे अँड्रॉइड व iOS ॲप्स अजूनही डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. Windows आवृत्ती व वेबसाइट वरील बंदी संबंधित व्यक्तींची चूक लक्षात आल्यावर कदाचित उठवली जाईल.

यावरील बंदी उठेपर्यंत तुम्ही इतर काही पर्याय वापरू शकता त्यांची यादी खाली दिली आहे.

Exit mobile version