अँड्रॉइडमध्ये आता अनेक नव्या सोयी : Meet वर मित्रांसोबत यूट्यूब व्हिडिओ पहा!

गूगलने त्यांच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक नव्या सोयी जाहीर केल्या असून गूगल मीट, Gboard, Wear OS, Nearby Share यांमध्ये या नव्या सोयी जोडल्या जाणार आहेत. मेसेजिंग आणि फाइल शेयरिंग अधिक सोपं करण्याच्या दृष्टीने या सोयी काम करतील.

Google Meet मध्ये आता आपण आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मित्रांसोबत एकत्र यूट्यूब व्हिडिओ पाहू शकतो! Co Watch करण्यासाठी नव्या लाईव्ह शेयरिंग फीचर्समुळे हे शक्य होणार आहे. आपण यूट्यूबवरील गाणी, चित्रपट, कॉमेडी शो किंवा कोणतेही व्हिडिओ गूगल मीट सुरू करून एकत्र पाहू शकता! शिवाय UNO!™ Mobile, Kahoot! किंवा Heads Up! अशा गेम्ससुद्धा एकत्र खेळू शकाल!

यासोबत आता गूगल मीटमध्ये Multi Pinning ची सोय देण्यात आली आहे जेणेकरून त्या मीटिंगमधील बोलणाऱ्या एकपेक्षा जास्त लोकांना सर्वात वरती ठेऊन बोलू शकाल.

Gboard : या किबोर्ड ॲपमध्ये emojify नावाची नवी सोय मिळेल ज्यात मेसेज टाइप केल्यावर त्यामधील कंटेंट ओळखून आपोआप इमोजी सुचवून त्यांचा समावेशसुद्धा करून देईल. खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता. इमोजी किचनमध्ये दोन इमोजी एकत्र करून पाठवता येणार आहे!

Nearby Share द्वारे आपण आपल्या अँड्रॉइड फोन्समधून इतर फोन्समध्ये सहजपणे फाइल्स शेयर करू शकतो. आता आपल्याच दुसऱ्या फोन्स/टॅब्लेटमध्ये फाइल शेयर करायची असेल तर दोन्हीकडे लॉगिन असल्यास आपोआप तसा पर्याय दिसेल आणि लगेच फाइल शेयर करता येईल.

Sound Alerts : आवाज ऐकण्यामध्ये अडचणी असणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा सर्वांसाठीही ही गूगलची सोय उपयोगी ठरणार आहे. यामध्ये आपण ठराविक आवाज रेकॉर्ड करून त्यांना नाव देऊन सेव्ह करून ठेऊ शकतो. ज्यावेळी ते आवाज आपला फोन ऐकेल तेव्हा तो फोनवर त्या त्या नावाचं नोटिफिकेशन देईल. उदा. ओव्हनचा कुकिंग पूर्ण झाल्याच्या बीप आवाज सेव्ह केला तर ओव्हनचा बीप वाजला की आपल्या फोनवर आपोआप ओव्हनच्या नावाचा अलर्ट येईल! इतर गोष्टी जसे की डोरबेल, फायर अलार्म, बाळाच्या रडण्याचा आवाज, दरवाजावर टकटक केल्याचा आवाज असे बरेच आवाज सेव्ह करून त्यांचा अलर्ट लावू शकाल!

Wear OS : या स्मार्ट वॉच साठी असलेल्या ऑपरेटिंग सिस्टममध्येही नव्या सोयी देण्यात आल्या आहेत. गूगल कीपमधील नोट्स पाहता व तयार करता येतील. Bitmoji चा वापर आता घड्याळातसुद्धा करता येईल.

गूगल वर्कस्पेसमधील ॲप्स आता टॅब्लेटसारख्या मोठ्या स्क्रीन्सवरही चांगल्या प्रकारे वापरता येतील!

https://youtu.be/NGvwKanKdL8
Exit mobile version