Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी!

विंडोजची नवी ऑपरेटिंग सिस्टम विंडोज ११ ला काल रात्री नवं अपडेट उपलब्ध करून देण्यात आलं असून या अपडेटचं नाव Windows 11 2022 Update Version 22H2 असं आहे. विंडोज ११ सादर झाल्यापासून जवळपास एक वर्षाने हे नवं अपडेट देण्यात येत आहे. यामध्ये बऱ्याच नव्या सोयी जोडण्यात आल्या आहेत.

अपडेट करण्यासाठी Settings > Update & Security > Check For Updates

स्टार्ट मेन्यू : स्टार्ट मेन्यूमध्ये आता फोल्डर तयार करून त्यामध्ये प्रकारानुसार Apps जोडता येतील. आता आवडीनुसार लेआऊटसाठी तीन पर्याय निवडता येतील. (More Pins, Default & More Recommendations)

विंडोज स्टुडिओ इफेक्टस : ही सुविधा अनेकांना नक्कीच आवडेल. आपल्या वेबकॅममध्ये आता बॅकग्राऊंड ब्लर करण्याची सोय मायक्रोसॉफ्टने विंडोजच्या सेटिंग्जमध्येच दिली आहे! कमी अधिक ब्लरचाही पर्याय आहे. ऑटो फ्रेमिंग, आय कॉनटॅक्ट अशा सुविधाही यामध्ये आहेत. बॅकग्राऊंडमधील आवाज कमी करून आपल्या आवाजावर फोकस करण्याचाही पर्याय ऑडिओ इफेक्टसमध्ये आहे.

फ्री व्हिडिओ एडिटर : विंडोज ११ मध्ये आता ClipChamp नावाचा बेसिक व्हिडिओ एडिटर मोफत देण्यात येत आहे. याद्वारे गरजेपुरत्या व्हिडिओ एडिटिंग करू शकता जसे की कॉपी, पेस्ट, ट्रिम, इमेजेस, टेक्स्ट जोडणे इ.

टच अपडेट्स : snap layout मुळे विंडोज वापरणं सोपं झालं आहे आता यासोबत त्यांनी नव्या टच gestures चीसुद्धा जोड दिली आहे. App Switching मध्ये यांचा वापर होईल.

ClipChamp

गेमिंग अपडेट्स : विंडोज ११ मध्ये गेमिंग आता आणखी वेगवान आणि सोपं होणार आहे. विंडोज गेम्समधील लेटन्सी कमी होईल आणि Auto HDR, Variable Refresh Rate सारख्या सोयी मिळतील.

चाचणी सुरू असलेलं फाइल एक्सप्लोररमध्ये टॅब्जचा पर्याय मात्र ऑक्टोबर अपडेट मध्ये दिला जाईल असं मायक्रोसॉफ्टने सांगितलं आहे.

Exit mobile version