ChatGPT चर्चेत असलेला AI : सर्व प्रश्नांची स्मार्ट उत्तरे देणारा चॅटबॉट

OpenAI या कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणाऱ्या कंपनीने तयार केलेलं नवं ChatGPT नावाचं मॉडेल गेले काही दिवस प्रचंड चर्चेत आहे. याच्या वेबसाइटवर हे मॉडेल उपलब्ध झाल्यानंतर अवघ्या ५ दिवसात तब्बल १० लाख यूजर्सचा टप्पा गाठला आहे. आपण विचारलेल्या जवळपास प्रत्येक प्रश्नाचं मुद्देसुद उत्तर देणे, त्या पुढे येणाऱ्या प्रश्नावर उत्तर देणे, निबंध लिहून देणे, पत्र लिहून देणे, विचारलेला प्रोग्रॅम कोड तयार करून देणे, त्याच्या चुका मान्य करणे, अयोग्य प्रश्नांची उत्तर देण्यास मनाई करणे अशी सर्व कामे हा AI अपेक्षेपेक्षा चांगल्या प्रकारे करू शकतो.

https://openai.com/blog/chatgpt/

गेल्या काही दिवसात अनेकांनी याच्याकडून बऱ्याच काही गोष्टी करून घेतल्या आहेत आणि त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेयर केले आहेत. काही जणांनी AI कडून विविध विषयांवर निबंध लिहून घेतले आहेत, काहींनी कंपनीला पाठवायचा resume, सुट्टीचा अर्ज, राजीनाम्याचं पत्र, ईमेल्सचा मजकूर तयार करून घेतले. काही यूजर्सनी कविता, रॅप, गाणी करायला सांगितली तर काहींनी थेट त्यांच्या प्रोग्रॅमसाठी कॉम्प्युटर कोडसुद्धा घेतले आहेत. काहींनी शब्दकोडं सोडवून घेतलं आहे. तुम्ही लिहलेल्या कोडमधील चुकासुद्धा हा AI शोधून देतोय. या AI चं हे वैशिष्ट्य आहे की हा संवाद साधत असल्या प्रमाणे उत्तरे देतो आणि आपण आधी दिलेली माहिती लक्षात ठेवून त्याप्रमाणे उत्तरामध्येही गरजेनुसार बदल करतोय!

विशेष म्हणजे ChatGPT बऱ्यापैकी सुसंगत उत्तरांसोबत या सर्व गोष्टीसुद्धा अचूक पद्धतीने करतोय! कितीतर वेळा याचं उत्तर अगदी प्रोफेशनल व्यक्तिसुद्धा देऊ शकणार नाहीत एव्हढया अचूक शब्दांसह मजकूर तयार करून मिळतोय! काही जणांनी तर त्यांच्या आवडत्या प्रसिद्ध व्यक्ती, इंफ्लुएन्सर्स अमुक गोष्ट अमुक प्रकारे कशी लिहतील किंवा कशा प्रकारे व्यक्त होतील असंही विचारून पाहिलं असून त्यांनासुद्धा हा AI त्या त्या व्यक्तीच्या शैलीमध्ये उत्तरे लिहून दाखवतोय!

ChatGPT वेबसाइटचा Interface

ChatGPT कसं वापरायचं ?

  1. प्रथम या लिंकवर जा https://chat.openai.com
  2. तिथे तुमचा ईमेल आयडी, नाव, फोन नंबर टाकून अकाऊंट तयार करा.
  3. यानंतर तुम्ही ChatGPT मध्ये लॉगिन झाल्यावर कोणतेही प्रश्न विचारू शकता.
  4. खाली दिलेल्या बॉक्समध्ये तुमची request, question टाइप करून Submit करा
  5. AI एका क्लिकवर तुम्हाला कृती करून उत्तर देईल.

याला विचारण्यासाठी उदाहरणार्थ काही प्रश्न

अर्थात यामध्येही काही उणिवा आहेतच. त्यांनी स्वतः हा कधी कधी चुकीची माहिती देऊ शकतो, हिंसक किंवा पक्षपाती वाटेल असं उत्तर देऊ शकतो, २०२१ नंतरच्या घटनांची मर्यादित माहिती याच्याकडे आहे. कारण याच्याकडे देण्यात आलेली माहिती २०२१ पर्यंतचीच आहे आणि हा इंटरनेटसोबत जोडलेला नाही त्यामुळे हा पूर्ण अपडेटेड माहिती देऊ शकत नाही. शिवाय प्रश्न जरा नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारे विचारण्यात आला तर त्याला त्यामागचा अर्थ समजून न घेता वेगळ्या अर्थाचं उत्तर मिळेल.

काही महिन्यांपूर्वी आलेल्या DALL·E नावाच्या AI चा वापर करून केवळ काही शब्दांच्या इनपुटवर खरे वाटतील असे फोटो, चित्रं तयार करणारं टुल सुद्धा OpenAI नेच बनवलं होतं. त्याच्यामधील कलागुण पाहून अनेकांनी फोटोग्राफर्स आणि चित्रकारांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. आता ChatGPT मुळे प्रोग्रॅमर्स, कोडर्स, कॉपीरायटर्स यांच्याबद्दलही असं बोलणं सुरू झालं आहे!

काहीजण या AI चा वापर करून दुसऱ्या AI मॉडेलला कनेक्ट करत त्यांच्या संवादाचेही स्क्रीनशॉट शेयर करत आहेत.

हे तयार करणाऱ्या कंपनी Sam Altman यांनी स्थापन केली होती. त्यावेळी इलॉन मस्कचासुद्धा या कंपनीत सहभाग होता. नंतर इलॉन मस्क बाहेर पडला मात्र अजूनही त्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. Greg Brockman (ex Stipe), Ilya Sutskever (ex Google), Mira Murati (ex Tesla) हे आणखी सहसंस्थापक आहेत.

यासोबत मायक्रोसॉफ्टनेही OpenAI मध्ये तब्बल 1 बिलियन डॉलर्स गुंतवले आहेत आणि त्यांच्या Azure क्लाऊड सेवांचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. Reid Hoffman (LinkedIn co-founder),
Peter Thiel (PayPal co-founder), Jessica Livingston (founding partner of Y Combinator) यांनीही यामध्ये गुंतवणूक केली आहे. भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसचासुद्धा सहभाग आहे.

Exit mobile version