MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home AI

DeepSeek नावाच्या चीनी AI मुळे टेक कंपन्यांच्या शेयर्समध्ये पडझड!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 28, 2025
in AI, News
DeepSeek AI

DeepSeek हे चीनमध्ये तयार करण्यात आलेलं एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल आहे, जे चीनच्या हांगझोऊ शहरातील संशोधन प्रयोगशाळेत विकसित करण्यात आले आहे. High-Flyer या हेज फंड ची मालकी असलेली ही कंपनी लियांग वेंफेंगने (Liang Wenfeng) २०२३ मध्ये स्थापित केली होती आणि अवघ्या दोन वर्षात त्यांनी ChatGPT, Gemini आणि Claude AI सारख्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक कार्यक्षमतेसह काम करू शकेल असं मॉडेल तयार केलं आहे!

सोप्या शब्दात सांगायचं तर DeepSeek हा एका चीनी कंपनीने बनवलेला ChatGPT चा स्पर्धक आहे. गेल्या काही दिवसात या स्वस्त मॉडेलच्या चॅटबॉटची अमेरिकेत प्रसिद्धी वाढली आणि आता हे App Store मध्ये पहिल्या स्थानी पोचलं आहे! १० जानेवारीला यांचं App उपलब्ध झालं आणि २७ जानेवारीला अमेरिकेत सर्वात डाउनलोड केलेल्या Apps च्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे!

ADVERTISEMENT

DeepSeek ची अधिकृत वेबसाइट : https://www.deepseek.com

OpenAI किंवा तशा प्रकारच्या AI कंपन्यांच्या तुलनेत अतिशय कमी खर्चात आणि विशेष म्हणजे अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे त्यांना उत्तम प्रकारचे GPU मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले नाहीत तरीही त्यांनी हे DeepSeek नावाचं मॉडेल तयार केलं आहे! हे मॉडेल त्यांनी Open Source केलं आहे त्यामुळे कोणीही याचा मोफत वापर करू शकतो आणि ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या सिस्टमवर इंस्टॉल करून… या Efficiency मुळेच अमेरिकन टेक जगात खळबळ माजली आहे की अमेरिकन कंपन्या यावर अब्जावधी डॉलर्स खर्च करत असताना यांनी इतक्या कमी खर्चात हे इतकं चांगलं मॉडेल कसं तयार केलं?

याच्या डेव्हलपमेंटसाठी फक्त 6 मिलियन डॉलर्स खर्च आला आहे असं कंपनीने म्हटलं आहे दुसरीकडे अमेरिकन कंपन्या शेकडो मिलियन डॉलर्स खर्च करत आहेत!

DeepSeek ची वैशिष्ट्ये

  • मुक्त आणि ओपन-सोर्स: DeepSeek हा एक मुक्त (ओपन-सोर्स) AI Assistant आहे, ज्यामुळे युजर्सना वापरणं सोपं झालं आहे.
  • किमतीत कमी: DeepSeek R1 मॉडेल OpenAI च्या GPT-3 च्या तुलनेत २० ते ५० पट कमी खर्चात उपलब्ध आहे, ज्यामुळे ते अधिक लोकांसाठी उपयुक्त ठरते.
  • उच्च कार्यक्षमता: या मॉडेलने गणितं आणि सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात उत्तम कार्यक्षमता दर्शवली आहे. AIME benchmark मध्ये तर OpenAI ला सुद्धा मागे टाकलं आहे!
  • DeepSeek R1सध्याचं जगातलं सर्वात पॉवरफुल reasoning models पैकी एक असल्याचं म्हटलं जात आहे.

DeepSeek च्या उदयामुळे AI उद्योगात मोठा बदल दिसून येईल. याच्या ओपन-सोर्स दृष्टिकोनामुळे इतर कंपन्यांना त्यांच्या धोरणांवर पुन्हा विचार करण्यास भाग पडले आहे. यामुळे काही मोठ्या टेक कंपन्यांचे स्टॉक्स देखील पडले आहेत. याचा सर्वात मोठा फटका साध्या Nvidia वर पडलेला दिसतोय. त्यांचा शेयर्स दोन दिवसात जवळपास १५ टक्क्यांनी पडले आहेत! एकूण मार्केटमध्येही तब्बल 1 ट्रिलियन डॉलर्सनी घसरण झालेली दिसून येत आहे!

सर्व चित्र एकंदरीत AI क्षेत्रासाठी चांगलं वाटत असलं तरी हे मॉडेल चीनमध्ये तयार झाल्यामुळे साहजिकच सेन्सॉरशिपचा मुद्दा पुढे आला आहे. चीनसंबंधित बऱ्याच विषयांची माहिती विचारली असता हे मॉडेल उत्तर देत नाही. तियानमेन स्क्वेअरबद्दल तर अजिबातच माहिती देत नाही. त्या अर्थी तेथील राजकीय आणि संवेदनशील मुद्दे थेट वगळले आहेत हे दिसून येतं.
शिवाय यामधील उत्तरे बऱ्याच वेळा गरज नसताना खूप गुंतागुंतीची आहेत असंही निरीक्षण बऱ्याच जणांची सोशल मीडियावर नोंदवलं आहे.

अचानक मिळालेल्या प्रसिद्धीमुळं साहजिकच हॅकर्सचीही नजर यांच्याकडे वळली आणि काल त्यांच्या सर्व्हर्सवर सायबरअटॅक झाला आहे. सध्या त्यांनी नवीन युजर्सची नोंदणी मर्यादित ठेवली आहे.

सध्या OpenAI, ,मेटा व गूगल अशा मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत डीपसीक काही गोष्टी अजूनही करू शकत नाही हे जरी खरं असलं तर अल्पावधीत त्यांनी जे यश मिळवलं आहे ते नक्कीच आश्चर्य वाटेल असं आहे. त्यांचं कमी खर्चात इतकं Efficient मॉडेल तयार करणं अमेरिकन कंपन्या आणि त्यांचे गुंतवणूकदार यांना नक्कीच विचार करायला भाग पाडणार आहे…

Tags: AIChinaDeepSeek
ShareTweetSend
Previous Post

सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

Next Post

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
Next Post
डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech