तुमच्या फोटोंद्वारे बनवा भन्नाट डिजिटल चित्रं : Lensa AI ची कमाल!

काही दिवसांपूर्वीच उपलब्ध झालेल्या Lensa ॲप सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर करून आपण आपलोड केलेल्या फोटोंचा संदर्भ घेत आपली डिजिटल चित्रे तयार करून मिळतात. यामधील Magic Avatars नावाची सोय वापरुन ही चित्रं बनवली जातात. सध्या बरेच सेलेब्रिटी, सोशल मीडिया यूजर्स त्यांचे असे AI ने तयार केलेले फोटो मोठ्या प्रमाणात शेयर करत आहेत. दिलेल्या

हे Lensa AI ॲप काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या Prisma ॲप तयार करणाऱ्या डेव्हलपर्सनीच बनवलेलं आहे. Prisma Labs असं या कंपनीचं नाव आहे. Magic Avatars ही सोय म्हणजे आपण नेहमी पाहतो तसे फिल्टर्स किंवा फोटो इफेक्टस नाहीत. मॅजिक अवतार म्हणजे आपण दिलेल्या फोटोंचा अभ्यास करून त्यावरून AI ने स्वतः तयार केलेल्या इमेजेस आहेत! यासाठी Stable Diffusion न्यूरल नेटवर्कचा वापर केलेला आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे अवतार तयार करून मिळतात. यामधील काही अवतार तर अक्षरशः जादुई वाटतील इतक्या चांगल्या प्रकारे दिसत आहेत.

Lensa द्वारे तयार केलेले अवतार https://www.instagram.com/explore/tags/lensaapp इंस्टाग्रामवर पाहू शकता.
बऱ्याच जणांनी #AIAvatars #AI #Avatars #aigenerated #aiportraits अशा हॅशटॅग्सचाही वापर केला आहे.

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही असे AI Avatar इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत (लिंक)
Lensa AI ॲप कसं वापरायचं ?
  1. प्रथम Lensa ॲप डाउनलोड करून घ्या
  2. उघडल्यावर Magic Avatar चा पर्याय निवडा
  3. ही सोय वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील. (खाली अधिक माहिती दिलेली आहे)
  4. आता तुमचे फोनमधील १०-२० पोर्ट्रेट फोटो सिलेक्ट करून अपलोड करा.
  5. Import केल्यावर आपल्याला किती AI Images तयार करून हव्या आहेत त्यानुसार पैसे देण्याचा पर्याय दिसेल.
  6. यानंतर जवळपास २० मिनिटे थांबा आणि तुम्हाला या ॲपने तयार केलेली भन्नाट चित्रं पाहायला मिळतील.

Lensa ॲपमधील फिल्टर्स, बॅकग्राऊंड काढून टाकणे, आर्ट स्टाइल इफेक्टस अशा सोयी काही प्रमाणात मोफत उपलब्ध आहेत मात्र आपण आज जे व्हायरल झालेल्या इमेजेस पाहत आहोत त्यासाठी Magic Avatar नावाची सोय वापरली जाते. Magic Avatar तयार करण्यासाठी AI साठी खूप जास्त प्रमाणात Computation चा वापर होतो त्यामुळे ही सोय वापरण्यासाठी ही कंपनी सध्या यूजर्सकडून पैसे घेत आहे. यासाठी उपलब्ध प्लॅन्स खालील प्रमाणे आहेत.

हे ॲप आणि त्यामधील इतर सोयी वापरण्यासाठी वेगळं सबस्क्रिप्शनसुद्धा असून त्यासाठी वर्षाला २४९९ रु द्यावे लागतात (७ दिवसांची मोफत ट्रायल उपलब्ध आहे)

अशा ॲप्समुळे डिजिटल आर्टिस्टचं काम भविष्यात AI द्वारे केलं जाईल अशीही भीती अनेकांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सध्या यामध्ये काही त्रुटी असल्या तरी भविष्यात हे आणखी वेगाने सुधारित स्वरूपात येईल तसं आर्टिस्टनी व्यक्त केलेली भीती थोड्या प्रमाणात का होईना खरी ठरू शकते. यासोबत गेल्या काही दिवसांत अनेकांनी असंही सांगितल आहे की Lensa मधील AI खऱ्या आर्टिस्टच्या चित्रांचा उपयोग त्यांना श्रेय न देता त्यांच्या परवानगीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी करत आहे. काही जणांनी त्यांच्या AI Avatar मध्ये आर्टिस्टचं नाव दिसलं आहे तर काहींनी आर्टिस्टचं पुसट सही दिसत असल्याचंही सांगितलं आहे.

Lensa AI Lensa: Photo/Pictures Editor डाउनलोड लिंक्स

Download Lensa on Google Play : https://play.google.com/store/apps/details?id=com.lensa.app
Download Lensa on Apple App Store : https://apps.apple.com/us/app/lensa-photo-picture-editor/id1436732536

Exit mobile version