MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home AI

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 4, 2026
in AI
Anthropic AI Plugins IT Selloff

काही दिवसांपूर्वी अँथ्रोपिक (Anthropic) या AI क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने त्यांच्या Claude AI सेवेमधील Cowork Agent साठी ११ नवीन प्लगइन्स आणले ज्याद्वारे जगभरातील कायदाविषयक, सेल्स (विक्रीविषयक), मार्केटिंग आणि डेटा अॅनॅलिसिस कामे ऑटोमेट म्हणजेच या AI Agent द्वारे स्वयंचलित करता येऊ शकतात.

  • लीगल (Legal) आणि करारांची पडताळणी: वकिलांच्या किंवा लीगल टीमच्या मदतीशिवाय कायदेशीर कागदपत्रे वाचणे, समजून घेणे आणि त्यावर कार्यवाही करणे.
  • कोडिंग आणि डेटा ॲनालिसिस: ज्युनिअर इंजिनिअर्स जी कामे तासनतास करत असत, ती कामे हे AI एजंट काही मिनिटांत आणि अधिक अचूकपणे करू शकते.
  • स्वयंचलित वर्कफ्लो: सेल्स, मार्केटिंग आणि ॲडमिनशी संबंधित कामे (उदा. ईमेल पाठवणे, रिपोर्ट्स बनवणे) पूर्णपणे ऑटोमेट करणे.

या नव्या टूलमुळे SaaS म्हणजेच सॉफ्टवेअर अॅज ए सर्व्हिस प्रकारचा सेवा देणाऱ्या मोठ्या कंपन्यांचा व्यवसाय कमी होऊ शकतो अशी भीती दिसू लागल्याने आधी अमेरिकेतील स्टॉक मार्केट आणि आज भारतातील स्टॉक मार्केटमधील आयटी कंपन्यांचे शेयर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत!

ADVERTISEMENT

NIFTY IT निर्देशांक जवळपास 6.3% ने घसरला असून ही मार्च २०२० नंतरची सर्वात मोठी घसरण असेल. Infosys, TCS, Wipro, HCL Tech आणि Persistent Systems यांच्या शेअर्समध्ये सुमारे ४ ते ७% पर्यंत घसरण झाली. काही कायदा-सॉफ्टवेअर कंपन्यांचे शेअर्स १०%-२०% पर्यंत खाली आलेत.

सोप्या भाषेत सांगायचे तर, अमेरिकन आणि युरोपियन क्लायंट्ससाठी कोडिंग, टेस्टिंग आणि मेंटेनन्सची कामे करण्यासाठी भारतीय कंपन्या हजारो इंजिनिअर्सना कामावर ठेवतात. जर AI एजंट एका तासात १० माणसांचे काम करू लागले, तर IT कंपन्यांचे ‘बिलिंग’ (Billable Hours) कमी होतील. कोडिंग, टेस्टिंग आणि डेटा एंट्रीसारखी जी कामे फ्रेशर्स किंवा ज्युनिअर लेव्हलवर केली जात होती, ती आता AI स्वतः करू शकेल. त्यामुळे क्लायंट्सना मोठ्या IT टीमची गरज उरणार नाही.

‘SaaSpocalypse‘ ची भीती: जागतिक स्तरावर याला ‘SaaSpocalypse’ (सॉफ्टवेअर-ॲज्-अ-सर्व्हिसचा अंत) असे म्हटले जात आहे. जर AI स्वतः सॉफ्टवेअर डेव्हलप आणि मॅनेज करू शकत असेल, तर महागड्या सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शनची गरज कमी होईल.

अँथ्रोपिकच्या नवीन प्लग्इन्समुळे “AI आता माणसांची जागा घेण्यास सज्ज झाले आहे,” हा संदेश गेला आहे. यामुळे भारतीय IT कंपन्यांच्या मनुष्यबळ-आधारित (Manpower-heavy) बिझनेस मॉडेलवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आपण सध्या AI टूल्समध्ये ChatGPT किंवा Gemini चाच वापर करताना पाहत असतो मात्र सॉफ्टवेअर कोडिंग किंवा आयटीमधील सेवांमध्ये Claude AI त्यांच्यापेक्षा चांगलं मॉडेल देत आहे.

गेले काही महिने अनेक आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरू असून कोरोना काळात मोठ्या प्रमाणात झालेली भरती हे कारण सांगितलं जात होतं. आता मात्र स्पष्टपणे AI मुळेच पुढील नोकऱ्यांचं प्रमाण कमी होत आहे हे दिसून येत आहे. आता या नव्या टूल मुळे तर थेट कंपन्यांच्याच भविष्याबद्दल मार्केटच्या मनात शंका उत्पन्न झाली आहे त्यामुळेच ही शेयर्सची पडझड दिसून येत आहे.

Cowork now supports plugins.

Plugins let you bundle any skills, connectors, slash commands, and sub-agents together to turn Claude into a specialist for your role, team, and company. pic.twitter.com/7RhhbZgcfD

— Claude (@claudeai) January 30, 2026
Tags: AIAnthropicClaudeShare Market
ShareTweetSend
Previous Post

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

Next Post

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
Next Post
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech