२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

आज हॅकर्सच्या फोरमवर एका हॅकरने २०२१ मध्ये scrape केलेला डेटा मोफत प्रकाशित केला असून यामुळे जगभरातील जवळपास २० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा (ईमेल आयडी) इंटरनेटवर उपलब्ध झाले आहेत. २०२१ मध्ये ट्विटरच्या API मध्ये असलेली त्रुटी ओळखून हॅकर्सनी हा डेटा मिळवला होता.

सध्यातरी प्रकाशित झालेल्या माहितीनुसार यामध्ये कुणाचाही पासवर्ड लीक झालेला नाही. मात्र ट्विटरसोबत असा प्रकार यापूर्वीसुद्धा झाला होता मात्र यावेळी दुपटीहून जास्त प्रमाणात ईमेल आयडी हॅकर्सना मिळाले आहेत. ईमेल आयडी, युजरनेम, नाव आणि इतर सोशल मीडिया प्रोफाइलची माहिती यामधून हॅकर्सकडे गेली आहे.

आज Have I Been Pwned या वेबसाइटतर्फे या हॅकची माहिती अनेकांना ईमेल मार्फत मिळाली. या वेबसाइटवर जाऊन तुमचा ईमेल आयडी किंवा फोन नंबर टाकल्यास तुमचे कोणकोणते अकाऊंट हॅक झाले आहेत याची यादी दिसते. जर तुमचा ईमेल या हॅक झालेल्या यादीत असेल Oh no — pwned! असा मेसेज दिसेल आणि खाली आणखी माहिती दिलेली असेल.

या वेबसाइटचा डेव्हलपरने दिलेल्या माहितीनुसार या २० कोटी ईमेल आयडीपैकी ९८% ईमेल आयडी यापूर्वीच हॅक/लिक झालेल्या यादीतले आहेत. त्याअर्थी त्यांनी जुनी यादी ट्विटरच्या API ला जोडून त्या त्या ईमेलला जोडण्यात आलेल्या अकाऊंटची यादी मिळवली आहे.

आधीच इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून अनेक गोंधळ सुरू आहेत. रोज नवा काहीतरी बदल केला जातोय आणि त्यात आज या हॅकची बातमी आली आहे.

काही महिन्यांपूर्वी याच हॅकबद्दल ट्विटरने पोस्ट लिहून माहिती दिली आहे आणि यासंबंधीत त्रुटी दूर केली आहे. लिंक : Incident impacting accounts

या हॅकमध्ये पासवर्ड्स हॅकर्सच्या हाती लागले नाहीत असं दिसत असलं तरीही तुम्ही खूप दिवस पासवर्ड बदलला नसेल तर नक्की बदलून घ्या.

Exit mobile version