DJI चा नवा Inspire 3 ड्रोन : 8K फुलफ्रेम सेन्सरसह!

DJI या ड्रोन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने काल त्यांचा नवा ड्रोन सादर केला असून हा प्रामुख्याने सिनेमॅटोग्राफर्सना समोर ठेऊन तयार करण्यात आला आहे. यामध्ये आता चक्क 8K Full Frame सेन्सर (Zenmuse X9-8K Air Gimbal Camera sensor) दिला आहे. हा ड्रोन ProRes फॉरमॅटमध्ये 8K 75fps व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो!

यासोबत नवा DJI RC Plus controller असून यामध्ये ७ इंची 1200-nit डिस्प्ले आणि 3.3 तासांची बॅटरी लाईफ आहे. ड्रोनमध्ये TB61 dual batteries सपोर्ट असून याद्वारे हा ड्रोन 28 मिनिटे उडवता येईल!

या ड्रोनची किंमत सुद्धा यामधील सुविधांसारखीच अफाट म्हणजेच $16499 (~₹१३,५०,०००) इतकी आहे . याच्यामध्ये DJI Inspire 3 ड्रोन, Zenmuse X9-8K Air Gimbal कॅमेरा, RC Plus remote controller, 6x TB51 Intelligent बॅटरी, Charging Hub, PROSSD 1TB, Trolley Case, 3x Foldable Quick-Release Propellers (Pair), Lens Carrying Box, RC Plus Strap, इ. गोष्टी मिळतील. याच्या कॅमेरासाठी स्वतंत्र लेन्स सुद्धा जोडता येतात!

सध्या भारतात ड्रोन आयातीवर बंदी आहे. त्यामुळे हा ड्रोन अधिकृतरित्या मिळणार नाही. काही दुकानांमध्ये हा इतर देशांच्या तुलनेत नंतर आणि अधिकच्या किंमतीत मिळू शकतो!

Exit mobile version