मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

Moto Edge 40

हा Motorola Edge 40 फोन जगातला सर्वात स्लिम IP68 रेटिंग असलेला 5G फोन आहे असं मोटोरोलाने सांगितलं आहे. या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट असलेला pOLED डिस्प्ले, डॉल्बी अॅटमॉस स्पीकर्स, 68W फास्ट चार्जिंग, सोबत 15W वायरलेस चार्जिंग, 50MP f/1.4 OIS कॅमेरा अशा भन्नाट सोयी असलेला हा फोनची किंमत २९९९९ एव्हढीच आहे!

MediaTek Dimensity 8020 हा प्रोसेसर असलेलासुद्धा हा जगातला पहिलाच फोन आहे. 8GB LPDDR4x रॅम, 256GB UFS 3.1 स्टोरेज, 4400mAh बॅटरी, 50MP+13MP आणि 32MP फ्रंट कॅमेरा सेटप, 4K Video Recording, eSIM सपोर्ट अशा अनेक सोयी दिलेल्या आहेत. या फोनच्या कॅमेरामध्ये असलेलं f/1.4 सर्वात wide म्हणता येईल असं आहे. फोनमध्ये Android 13 दिलेलं असून त्यानंतर २ सिस्टम अपडेट्स आणि ३ वर्षं सिक्युरिटी अपडेट्स देणार असल्याचं मोटोने सांगितलं आहे.

हा फोन ३० मेपासून फ्लिपकार्ट आणि motorola.in वर मिळेल.

डिस्प्ले : 6.55″ FHD+ pOLED 144Hz HDR10+
प्रोसेसर : MediaTek Dimensity 8020
रॅम : 8GB LPDDR4x
स्टोरेज : 256GB
कॅमेरा : 50MP f/1.4 + 13MP Ultrawide
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 4400mAh 66W Wired (15W Wireless)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 13
इतर : Bluetooth 5.2, 5G, WiFi 6
किंमत : 8GB+256GB: ₹29,999

तीस हजार किंमतीच्या फोन्समध्ये हा सध्या सर्वोत्तम पर्यायापैकी एक आहे. यामधील बऱ्याच सोयी फक्त याच फोनमध्ये मिळत आहे.

Exit mobile version