मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

मायक्रोसॉफ्टने काल अधिकृतपणे त्यांच्या नवीन ऑफिस आयकॉन्सची घोषणा केली आहे. आता सर्व आयकॉन्स त्यांच्या Gradients असलेल्या Fluent Design वर आधारित आहेत.

मायक्रोसॉफ्टच्या दहा मुख्य ऑफिस आयकॉन्सला हे नवीन रूप दिले जात आहे, जे मायक्रोसॉफ्टच्या Copilot आयकॉनपासून प्रेरित आहेत असं म्हणता येईल. २०१८ मध्ये झालेल्या आयकॉन बदलांनंतरचा पहिला मोठा बदल आहे आणि याचा उद्देश एक अधिक जोडलेले डिझाइन सिस्टम आणि Copilot चा मायक्रोसॉफ्ट 365 वर असलेला प्रभाव दर्शविणे आहे असं दिसून येत आहे.

मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस आयकॉन्समध्ये झालेला बदल
Exit mobile version