सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगने आज आपल्या घडी घालता येणाऱ्या फोल्ड स्मार्टफोन सिरिजमध्ये नवा फोन आणला आहे. गॅलॅक्सी झेड ट्रायफोल्ड (Galaxy Z TriFold) या नवीन फोनमध्ये नेहमीच्या तीन फोन डिस्प्ले एकत्रित असल्यासारखे दोन बाजूने घडी घालता येते! हा फोन घडी उघडल्यावर यामध्ये तब्बल १० इंची डिस्प्ले मिळतो! या फोनवर एकाच वेळी तीन ॲप्स फुलसाईज वापरता येतील!

या फोनची जाडी घडी उघडल्यावर केवळ 3.9mm इतकी आहे आणि दोन्ही घडी घातल्यावर असलेली जाडीसुद्धा त्या मानाने बरीच कमी 12.9mm आहे!

बरीच वर्षं चर्चेत असलेल्या या फोनचे प्रोटोटाइप ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा दाखवले गेले होते आणि आता हा फोन प्रत्यक्षात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनची विक्री दक्षिण कोरियात १२ डिसेंबरपासून सुरू होणार असून अमेरिका आणि इतर देशांत २०२६ च्या सुरुवातीला उपलब्ध होईल.

Trifold प्रकाच्या फोन्सची सुरुवात खरंतर हुवावे (Huawei) च्या Mate XT द्वारे झाली होती. येत्या काळात याची लोकप्रियता पाहून इतर कंपन्यासुद्धा असे पर्याय नक्की आणतील.

किंमत : दक्षिण कोरियात 512GB मॉडेलची किंमत जवळपास २ लाख २० हजार रुपये आहे. सुरवातीला फक्त ३०००० यूनिट्स तयार केले जातील. भारतात कधी उपलब्ध होईल याबद्दल सध्या काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

Exit mobile version