सॅमसंगने काल रात्री झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या फ्लॅगशिप Galaxy S सिरीजमधील Galaxy S26, Galaxy S26+ आणि S26 Ultra हे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. यावेळी प्रथमच प्रायव्हसी डिस्प्लेची नवी सोय दिली असून यामुळे आपल्या फोनची स्क्रीन फक्त आपल्यालाच दिसेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही कंपनीने कॅमेरा, परफॉर्मन्स आणि AI फीचर्समध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आणि Android 16 आधारित One UI 8.5 ओएस असणार आहे. Now Nudge, Now Brief, Circle to Search with Google, Creative Studio, Enhanced Nightography Video अशा सुधारित सोयी जोडण्यात आल्या आहेत.
Samsung Galaxy S26 : 6.3-inch FHD+*, Dynamic AMOLED 2X Display 120Hz adaptive refresh rate, 12MP Ultra-Wide + 50MP Wide + 10MP Telephoto Camera, 12MP Front Camera, 12 + 512GB/12 + 256GB, battery 4300 mAh 25W Charging, Android 16 One UI 8.5
Samsung Galaxy S26+ : 6.7-inch QHD+*, Dynamic AMOLED 2X Display , 120Hz adaptive refresh rate, 12MP Ultra-Wide + 50MP Wide + 10MP Telephoto Camera, 12MP Front Camera, 12 + 512GB/12 + 256GB, battery 4900 mAh 45W Charging, Android 16 One UI 8.5
Samsung Galaxy S26 Ultra : 6.9-inch QHD+*, Dynamic AMOLED 2X Display 120Hz adaptive refresh rate, 12MP Ultra-Wide + 50MP Wide + 10MP Telephoto Camera, 12MP Front Camera, 16GB + 1TB / 12GB+512GB / 12GB+256GB, battery 5000 mAh 60W Charging, Android 16 One UI 8.5
या फोन्सची भारतीय किंमत खालीलप्रमाणे :.
- Samsung Galaxy S26 : ₹87,999 पासून
- Samsung Galaxy S26+ : ₹1,19,999 पासून
- Samsung Galaxy S26 Ultra : ₹1,39,999 पासून

या फोन्ससोबत Galaxy Buds4 आणि Buds4 Pro सुद्धा सादर झाले आहेत. Buds4 ची किंमत १६९९९ आणि Buds4 Pro ची २२९९९ असणार आहे
नव्या फोन्समध्ये आधीच्या मॉडेलच्या तुलनेत फारसा काही बदल दिसून येत नाही आणि त्यात किंमतसुद्धा वाढवण्यात आली आहे. बॅटरी लाईफसुद्धा आणखी वाढवायला हवी होती. आता इथून पुढे फोन्सच्या किंमती वाढणार हे उघड असलं तरी हा बदल सॅमसंगच्या ग्राहकांना कितपत आवडेल याची शंका आहे.