Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

गेली अनेक वर्षं डिझाइन, कंटेंट क्रिएशन आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात ज्या प्लॅटफॉर्मने मोठा प्रभाव टाकला, त्या Freepik ने आता आपले नाव बदलून Magnific असे केले आहे. हा केवळ ब्रँडिंगमध्ये करण्यात आलेला बदल नसून एका स्टॉक फोटोज् वेबसाइटपासून संपूर्ण AI आधारित क्रिएटिव्ह इकोसिस्टममध्ये झालेलं परिवर्तन आहे.

नवी वेबसाइट : https://www.magnific.com

भारतामध्ये Freepik हा अनेक डिझाइनर्स, फ्रीलान्सर्स, स्टार्टअप्स आणि सोशल मीडिया मॅनेजर्ससाठी आवडीचा प्लॅटफॉर्म बनला आहे. इथे उपलब्ध असलेल्या व्हेक्टर ग्राफिक्स, इलस्ट्रेटर आणि फोटोशॉप फाइल्स, इमेजेस, स्टॉक फोटोज् त्यांतर आयकॉन्स, टेंप्लेट्स, म्युझिक, व्हिडिओज् असा कंटेंट मोफत आणि सोबत सबस्क्रिप्शन मध्येही उपलब्ध आहे.

विशेष म्हणजे, Freepik ने “freemium model” वापरून भारतीय मार्केटमध्ये मोठी पकड मिळवली होती. कालांतराने AI टूल्सचा समावेश वाढवत नेला आणि आता स्टॉक कंटेंटसोबत AI टूल्सचं सबस्क्रिप्शन घ्यावंच लागतं. स्टॉक इमेजेस प्लॅटफॉर्मवरून आता पूर्ण AI creative suite उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नवं नाव खरं तर आधी एका magnific.ai कंपनीचं होतं. ती कंपनी फ्रीपिकने विकत घेऊन आता स्वतःच्या कंपनीचं नावच magnific ठेवलं आहे! त्यांच्या Creative Suite मध्ये AI image generation, AI video creation, Advanced editing tools, Enterprise-level creative solutions मिळतात.

AI मुळे आता creativity अधिक सोप्या रूपात प्रत्येकाला उपलब्ध झाली आहे. भविष्यात डिझायनर्स फक्त ग्राफिक असेट्स वापरणार नाहीत, तर AI टूल्सचा वापर करून स्वतः कंटेंट तयार करतील.

Exit mobile version