एएमडी Ryzen 3 2200G व Ryzen 5 2400G APU प्रॉसेसर उपलब्ध!

एएमडीचे Ryzen 3 2200G आणि Ryzen 5 2400G प्रॉसेसर आता integrated graphics सह उपलब्ध!
ह्या प्रॉसेसरमध्ये आता Radeon Vega ग्राफिक्सचा अंतर्भाव करण्यात आला आहे! ग्राफिक्स कार्ड शिवाय उत्तम कामगिरी करू शकतील असे प्रॉसेसर असल्याचा एएमडीचा दावा!

काही महिन्यांपूर्वी सादर झालेल्या AMD च्या रायझन मालिकेतील प्रोसेसरना चांगला प्रतिसाद मिळाला. इंटेल प्रोसेसरमधील अडचणीमुळे तर आणखी ग्राहक AMD कडे वळले. इंटेल प्रॉसेसरपेक्षा कमी किंमत आणि अधिक Cores मुळे प्रथमच बरेच ग्राहक AMD कडे आकर्षित झाले. आता AMD ने त्यांच्या Ryzen 3 व Ryzen 5 या प्रॉसेसरमध्ये त्यांच्याच प्रसिद्ध ग्राफिक्स Radeon Vega चा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अंतर्गत ग्राफिक्स या फायदा ग्राहकांना मिळेल आणि त्यामुळे बाहेरून ग्राफिक्स कार्ड बसवण्याची गरज कमी होईल.

सध्याच्या बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीच्या मायनिंगसाठी GPU (ग्राफिक्स कार्ड) ची मागणी प्रचंड वाढलेली आहे. या मायनिंगसाठी वापर करणाऱ्याकडून स्टॉक संपत असून हे लोक उपलब्ध कार्ड्सची एकदम खरेदी करत आहेत. यामुळे बाजारात ग्राफिक्स कार्डचा तुटवडा निर्माण होऊन किंमती गगनाला भिडल्या आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याच ग्राफिक्स कार्डसची (Nvidia GTX1080, 1080Ti, 1070, 1050, Radeon Vega RX, इ) किंमती तिप्पट चौपट वाढलेल्या पाहायला मिळत आहेत! यामुळे पीसी गेमिंग बाजारात नाराजी पसरल्याच चित्र आहे. Nvidia ने याबाबत प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आहे मात्र त्याचा काही परिणाम होईल असं चित्र सध्यातरी दिसत नाहीय. आता या नव्या रायझन APU मुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

AMD कडून अधिकृत किंमती
Ryzen 3 2200G : $99 :  4 Cores, 4 Threads : 3.5GHz
Ryzen 5 2400G : $169 :  4 Cores, 8 Threads : 3.6GHz

search terms AMD Ryzen 5 2400G 3 2200G APU Desktop with Radeon Vega Graphics  Processor
एएमडी Ryzen 3 2200G व Ryzen 5 2400G APU प्रॉसेसर उपलब्ध! एएमडी Ryzen 3 2200G व Ryzen 5 2400G APU प्रॉसेसर उपलब्ध! Reviewed by Sooraj Bagal on February 12, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.