ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह!

ॲपलने भारतासाठी आपला All-New Apple Maps लाँच केला आहे. आता भारतातल्या युजर्सना पूर्वीपेक्षा जास्त वेगवान, अचूक आणि सोपं Navigation मिळणार आहे. या नव्या Map मध्ये रस्ते, इमारती, पार्क, Shopping Centres यांचा सविस्तर View मिळतो. सोबतच भारतातले ३०० पेक्षा जास्त प्रसिद्ध ठिकाणं आता 3D Landmarks मध्ये पाहता येणार आहेत. म्हणजे आता प्रवासाचं Planning करणं खूपच सोपं होणार आहे.

भारतातल्या रस्त्यांना लक्षात ठेवून ॲपलने यात काही खास फीचर्स दिली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे Enhanced Natural Language Guidance. आता Map फक्त “डावीकडे वळा” असं सांगणार नाही, तर “पुढच्या Traffic Light वर डावीकडे वळा” किंवा “पेट्रोल पंप नंतर उजवीकडे वळा” असं अगदी आपण बोलतो तसं सांगणार आहे. भारतातले बरेच रस्ते नावाशिवाय असतात, त्यामुळे Pillar, पेट्रोल पंप अशा जवळच्या प्रसिद्ध ठिकाणांचा वापर करून दिशा दाखवणं खूप उपयोगी ठरणार आहे.

आणखी एक मोठं अपडेट म्हणजे Dual-Language Labels. आता तुमच्या फोनची भाषा आणि त्या शहराची लोकल भाषा यानुसार Map वर नावं दोन भाषांमध्ये दिसतील. उदाहरणार्थ, दिल्लीत Hindi + English आणि मुंबईत Marathi + English असं दिसेल. यात Hindi, Bengali, Gujarati, Kannada, Malayalam, Marathi, Tamil, Telugu, Punjabi, Odia आणि Urdu अशा ११ भाषांचा सपोर्ट मिळतो.

Apple Maps मध्ये काय-काय नवीन मिळणार?

शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Privacy. Apple Maps वापरायला कोणतंही Sign-in लागत नाही. तुमचं Location आणि Search डेटा Random ID ने सुरक्षित ठेवला जातो. हे नवं अपडेट iOS 27.2, iPadOS 27.2, watchOS 27.2 आणि macOS 27.2 किंवा त्यापुढील व्हर्जनवर मिळणार आहे. जर तुम्ही आयफोन वापरत असाल, तर ॲपल मॅप्स नक्की अपडेट करून पाहा.

Exit mobile version