MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 25, 2026
in News
Apple New CEO John Ternus

जगभरातील सर्वात मोठ्या कंपन्यापैकी एक असलेली प्रमुख ॲपल कंपनीने त्यांचा नवीन CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) जाहीर केला असून सध्याचे सीईओ टिम कुक यांच्या नंतर ही जबाबदारी आता जॉन टर्नस (John Ternus) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ॲपलकडून हा निर्णय अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे.

जॉन टर्नस हे ॲपलमध्ये दीर्घकाळ काम करत आहेत (जवळपास २५ वर्षं) आणि सध्या ते हार्डवेअर विभागाचे प्रमुख आहेत. iPhone, Mac, iPad यांसारख्या कंपनीच्या महत्त्वाच्या उत्पादने डिझाईन करण्यात त्यांचा थेट सहभाग राहिला आहे. ॲपलच्या उत्पादनांची गुणवत्ता, त्यांची रचना आणि कामगिरी यामागे टर्नस यांचा मोठा वाटा मानला जातो. त्यामुळेच कंपनीच्या आत त्यांना विश्वासू आणि महत्त्वाचे नेतृत्व मानले जाते.

ADVERTISEMENT

ॲपलने काही वर्षांपूर्वी स्वतःचे ॲपल सिलिकॉन चिप तयार करून मॅकमध्ये वापरण्याचा मोठा निर्णय घेतला. या बदलामुळे मॅकबुक्सची गती वाढली आणि बॅटरीही जास्त काळ टिकू लागली. या संपूर्ण प्रक्रियेत जॉन टर्नस यांची भूमिका खूप महत्त्वाची होती. यामुळे कंपनीने इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःची ताकद वाढवली.

सीईओपदाची जबाबदारी स्वीकारताना टर्नस यांच्यासमोर अनेक मोठी आव्हानं असतील. ॲपल ही केवळ उत्पादन बनवणारी कंपनी नाही, तर ती विविध सेवा आणि काही प्रमाणात त्यांच्या उत्पादनांसाठी सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी आहे. या सर्व गोष्टींचा समतोल राखत पुढे जाणं आणि नवीन तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्येही कंपनीने आघाडी टिकवणं आवश्यक आहे.

टिम कुक यांच्या काळात ॲपलने आर्थिकदृष्ट्या मोठी झेप घेतली. त्यांचं मार्केट कॅपिटल तब्बल ४ ट्रिलीयन डॉलर्सच्या वर गेलं होतं. आता टर्नस यांच्या नेतृत्वाखाली कंपनी पुन्हा उत्पादनांमध्ये नवे बदल आणि सुधारणा आणण्यावर अधिक भर देईल, अशी अपेक्षा आहे.

ॲपलने केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, हा बदल अचानक घेतलेला निर्णय नाही, तर अनेक वर्षांच्या नियोजनानंतर घेतलेला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने एकमताने हा निर्णय मंजूर केला आहे. टिम कुक हे १ सप्टेंबर २०२६ पर्यंत सीईओ पदावर राहणार आहेत. यानंतर Tim Cook हे ॲपलचे Executive Chairman म्हणून काम पाहणार आहेत. या नव्या भूमिकेत ते कंपनीला धोरणात्मक मार्गदर्शन देतील. म्हणजेच, ते पूर्णपणे कंपनीपासून दूर जाणार नाहीत तर कार्यकारी अध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका निभावतील.

जॉन टर्नस यांनीही या नव्या जबाबदारीबद्दल भावना व्यक्त करताना सांगितलं की, ॲपलमध्ये जवळपास संपूर्ण कारकीर्द घालवताना त्यांना स्टीव्ह जॉब्स आणि टिम कुक यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, जी त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. त्यांनी पुढे कंपनीची दिशा कायम ठेवत नवनवीन उत्पादने आणि अनुभव तयार करण्यावर भर देण्याची तयारी दर्शवली आहे.

एकूणच, जॉन टर्नस यांची सीईओ म्हणून नियुक्ती ही ॲपलसाठी महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. कंपनीची ओळख जपत नवे बदल घडवून आणण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आहे. पुढील काही वर्षांत ॲपल कोणत्या दिशेने जातं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

ॲपलचे स्थापनेपासून आजवरचे सीईओ :

  1. Michael Scott (1977–1981)
  2. Mike Markkula (1981–1983)
  3. John Sculley (1983–1993)
  4. Michael Spindler (1993–1996)
  5. Gil Amelio (1996–1997)
  6. Steve Jobs (1997–2011)
  7. Tim Cook (2011–2026)
  8. John Ternus (2026-)

I want to thank everyone for the outpouring of love and thank you for believing in me to lead the company that has always put you at the center of our work. This is not goodbye. It’s a hello to John and I can’t wait for you to get to know him like I do! 🙏 pic.twitter.com/Q43QDG3UmZ

— Tim Cook (@tim_cook) April 21, 2026
Tags: AppleCEOJohn Ternus
ShareTweetSend
Previous Post

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

Next Post

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
Next Post
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech