MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Auto

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 16, 2026
in Auto

Tesla ने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या बहुप्रतीक्षित Next-Generation Roadster चे खास प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमात कारचा वेग, हवेत झेप घेण्याची क्षमता आणि SpaceX च्या तंत्रज्ञानावर आधारित विशेष Propulsion System यांची झलक पाहायला मिळाली. ही कोलांटी उडी म्हणजे backflip मारू शकते आणि काही सेकंदांसाठी उडूसुद्धा शकते!

ADVERTISEMENT

Tesla Roadster 2026: जवळपास नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवी झलक
Tesla च्या दुसऱ्या पिढीतील Roadster ची घोषणा नोव्हेंबर २०१७ मध्ये करण्यात आली होती. ही कार २०२० मध्ये बाजारात येण्याची अपेक्षा होती. मात्र अनेक वेळा उत्पादनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर १५ ऑक्टोबर २०२६ रोजी अमेरिकेतील टेक्सास येथे आयोजित कार्यक्रमात कंपनीने नव्या Roadster चे प्रात्यक्षिक दाखवले.

या कार्यक्रमामुळे इलेक्ट्रिक कारच्या कामगिरीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ही कार केवळ वेगवान इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार नसून भविष्यातील वाहन तंत्रज्ञान दाखवण्यासाठी तयार केलेला प्रयोगही आहे.

या कार्यक्रमातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे Roadster ने केलेले हवेत झेपावण्याचे प्रात्यक्षिक. SpaceX कंपनीच्या सहकार्याने या कारमध्ये विशेष Thruster System विकसित करण्यात आले आहे.
प्रात्यक्षिकात कारने विशेष Ramp वर उलट्या दिशेने धाव घेतली आणि त्यानंतर हवेत फिरून पुन्हा खाली काही सेकंद हवेत उडत खाली उतरली. कारच्या खाली बसवलेल्या Fan-based Suction System मुळे ती विशिष्ट पृष्ठभागाला चिकटून राहू शकते. तर High-pressure Air चा वापर करणारे Thrusters कारला हवेत दिशा बदलण्यासाठी आणि नियंत्रित हालचाली करण्यासाठी मदत करतात.

मात्र, याचा अर्थ Roadster ही सामान्य वापरासाठी तयार झालेली Flying Car आहे असा नाही. हे प्रात्यक्षिक नियंत्रित परिस्थितीत करण्यात आले असून अशा तंत्रज्ञानाचा सार्वजनिक रस्त्यांवर वापर करण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि सुरक्षिततेचे नियम अद्याप स्पष्ट नाहीत.

0 ते 60 mph वेग फक्त 0.81 सेकंदांत?
Roadster च्या प्रात्यक्षिकातील आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे तिचा वेग. इलॉन मस्क यांनी ही कार 0 ते 60 mph म्हणजे सुमारे ९७ किमी/तास वेग १ सेकंदापेक्षा कमी वेळेत गाठू शकते, असा दावा केला. या कारचा टॉप स्पीड 230 mph पेक्षा जास्त असेल.

महत्त्वाचे मुद्दे

  • कंपनीने 0 ते 60 mph वेग 1 सेकंदापेक्षा कमी वेळेत गाठण्याचा दावा केला.
  • SpaceX च्या सहकार्याने विकसित केलेल्या १० छोटे एअर थ्रस्टर्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे गाडीला अभूतपूर्व पकड (Grip) आणि वेग मिळतो.
  • यामधील २ हाय प्रेशर एयर टॅंक ही कार स्वतः रीचार्ज करेल. बाहेरून प्रॉपेलंट भरण्याची गरज नाही असं सांगितलं आहे!
  • Roadster चे Performance, Thrust आणि Rocket असे तीन प्रकार असतील.
  • Rocket प्रकार सार्वजनिक रस्त्यांवर वापरण्यास मान्यता नसल्याचे सांगण्यात आले.
  • उत्पादन 2028 मध्ये सुरू करण्याचे लक्ष्य आहे.

Real life, baby pic.twitter.com/3QEqn18wig

— Tesla (@Tesla) October 16, 2026

सोशल मीडियावर या कारमधील अनपेक्षित गोष्टींनी आश्चर्यचकित झाल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी शेयर केल्या आहेत तर काही जणांनी याला स्टंट संबोधून या कारच्या प्रत्यक्ष वापर क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Tags: CarsRoadsterTesla
ShareTweetSend
Previous Post

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Sony Vision S Electric Car

सोनीची इलेक्ट्रिक कार येणार : नव्या कार कंपनीची घोषणा!

January 5, 2022
FASTag ची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली : काय आहे फास्टॅग?

FASTag ची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली : काय आहे फास्टॅग?

December 1, 2019
टेस्ला सायबरट्रक सादर : इलेक्ट्रिक पिकअप ट्रक!

टेस्ला सायबरट्रक सादर : इलेक्ट्रिक पिकअप ट्रक!

November 22, 2019
इलॉन मस्कच्या बोरिंग कंपनीचा बोगद्यामधून कार वाहतूक प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण!

इलॉन मस्कच्या बोरिंग कंपनीचा बोगद्यामधून कार वाहतूक प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण!

December 19, 2018

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

October 16, 2026
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

October 16, 2026
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech