अॅपल आणि सॅमसंगच्या वादात नवे रंग : पहिला अॅपलचा तर आता सॅमसंगचा विजय

 कॅलिफोर्निया-Aug 25, 2012 सॅमसंग आणि अ‍ॅपल यांच्यात सुरु असलेली कायद्याची लढाई अ‍ॅपलने जिंकली आहे. याचबरोबर अ‍ॅपलने 1 अब्ज डॉलरचा पेटंट खटला जिंकला आहे. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा पेटंट खटला आहे. अ‍ॅपलने हा खटला जिंकल्यामुळे बाजारात या कंपनीचा दबदबा आणखी वाढण्यास मदत होणार आहे.


नऊ सदस्यीय ज्यूरींनी कॅलिफोर्नियातील सॅन होजे फेडरेल कोर्टात सुमारे 700 प्रश्नांवर विचार-विमर्श केला. यात दोन्ही कंपन्यांनी बौध्दिक संपदेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

अ‍ॅपल आणि सॅमसंग, या दोन्हीही कंपन्या स्मार्टफोन बनविणा-यामध्ये जगात प्रसिद्ध आहेत. या दोन कंपन्यांमधील कायद्यातील लढाईच्या निकालाचा निर्णय देताना सांगितले की, सॅमसंगने अ‍ॅपलच्या पेटंटचे उल्लंघन केले आहे.

टोकियो – Aug 31, 2012अ‍ॅपल आणि सॅमसंग या आघाडीच्या कंपन्यांमधील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे दिसते आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील न्यायालयाने अ‍ॅपलच्या पेटंटचे सॅमसंगने उल्लंघन केल्याचा निर्णय दिला होता. यानंतर अडचणीत आलेल्या सॅमसंगला टोकियोतील न्यायालयाच्या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. सॅमसंगने अ‍ॅपलच्या पेटंटचे कोणतेही उल्लंघन केले नसल्याचे टोकियोतील न्यायालयाने स्पष्ट केले. 

सॅमसंगने आपल्या आयफोन आणि आयपॅडमधील काही फिचर्सची तसेच टेक्नोलॉजीची कापी केल्याचा आरोप अ‍ॅपलने टोकियोतील न्यायालयात केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. सॅमसंगने या निर्णयाचे स्वागत करताना आम्ही अ‍ॅपलच्या कोणत्याही पेटंटचे उल्लंघन केले नसल्याचे म्हटले आहे. अ‍ॅपलने जगातील विविध न्यायालयात सॅमसंगच्या विरोधात पेटंटचे उल्लंघन केल्याबद्दल दावे दाखल केले आहेत. तरीही दक्षिण कोरियात मुख्यालय असलेल्या सॅमसंगने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.

परिणाम  : पेटंटच्‍या मुद्यावरुन सुरु असलेल्‍या कायदेशीर लढ्यात सॅमसंगचा पराभव झाला. अमेरिकेच्‍या न्‍यायालयाने ऍपलच्‍या बाजूने निकाल दिला. सॅमसंगने हा निकाल मान्‍य केलेला नाही. त्‍यामुळे हा लढा सुरुच राहणार आहे. परंतु, या निकालाचे स्‍मार्टफोन आणि टॅबलेट मार्केटवर परिणाम होणार आहेत. सॅमसंगचे बहुतांश स्‍मार्टफोन्‍स ऍण्‍ड्रॉईड ऑपरेटींग सिस्‍टीमवर चालतात. त्‍यामुळे गुगलवरही परिणाम होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.
स्‍मार्टफोनच्‍या मार्केटमध्‍ये ऍपलचा एक खास चाहता वर्ग आहे. ऍपलने मुसंडी मारली आहे. परंतु, या बाजारात सॅमसंगने ऍपलच्‍या वर्चस्‍वाला आव्‍हान दिले होते. ऍपलने ख-या अर्थाने स्‍मार्टफोनची ओळख जगाला करुन दिली. आज बाजारातील बहुतांश स्‍मार्टफोन एकसारखे दिसतात. विशेषतः टचस्‍क्रीन असलेले स्‍मार्टफोनमध्‍ये बरीच समानता आढळते. त्‍यामुळे ऍपलने पेटंटचा लढा जिंकल्‍यानंतर भविष्‍यात टचस्‍क्रीन असलेले स्‍मार्टफोन डिझाईन करताना कंपन्‍या आकार, रचना इत्‍यादी गोष्‍टींबाबत काळजी घेतील. ऍपलला टक्‍कर देण्‍यासाठी गुगलने ऍण्‍ड्रॉईड ऑपरेटींग सिस्टीम विकसित केली. ही सिस्‍टीम मोफत आहे. त्‍यामुळे या यंत्रणेवर आधारीत स्‍मार्टफोन्‍स अतिशय स्‍वस्‍त झाले आहेत. त्‍यामुळे स्‍मार्टफोन्‍सच्‍या बाजारपेठेत एक क्रांती आली. परंतु, ऍपलने खटला जिंकल्‍यानंतर आता ऍण्‍ड्रॉईडकडे मोर्चा वळविला आहे. सॅमसंगविरुद्धच्‍या खटल्‍यात गुगलला प्रतिवादी करण्‍यात आले नव्‍हते. परंतु, भविष्‍यात इतर कंपन्‍यांवर ऍपलचा धाक राहील. त्‍यामुळे ऍण्‍ड्राईडच्‍या वापरावर परिणाम होईल, असे तज्‍ज्ञांना वाटते. याचा फायदा मायक्रोसॉफ्ट आणि ब्‍लॅकबेरीला होऊ शकतोमोबाईलच्‍या युद्धात काही प्रमाणात मागे पडलेल्‍या नोकीयाला या निर्णयानंतर फायदा होऊ शकतो. नोकीयाकडे स्‍वतःचे अनेक पेटंट आहेत. त्‍यामुळे ऍपल नोकीयाला आव्‍हान देण्‍याची शक्‍यता नाही. सॅमसंगला फटका बसल्‍यामुळे बाजारपेठेवरही निश्चितच बराच परिणाम होईल. सॅमसंगने ऍपल आणि नोकीया या दोन्‍ही कंपन्‍यांचा बाजारातील मोठा हिस्‍सा काबीज केला होता.

सौजन्य  : 
Exit mobile version