Tag: War

SAMSUNG ची चोरी उघड; आता भरावा लागेल 182 हजार कोटींचा दंड!

SAMSUNG ची चोरी उघड; आता भरावा लागेल 182 हजार कोटींचा दंड!

SAMSUNG व APPLE या दोन दिग्गज कंपन्यांमध्ये मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या पेटेंटप्रकरणाचा अखेर निकाल लागला. साउथ कोरियन स्मार्टफोन निर्माता ...

‘कनेक्टिंग’ मायक्रोसॉफ्ट!

मायक्रोसॉफ्टकडून ' नोकिया ' ची खरेदी सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अग्रणी असलेल्या ' मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ' ने मंगळवारी मोबाइलहँडसेट निर्मितीतील एकेकाळच्या अव्वल ' नोकिया ' ला सुमारे ४७ हजार कोटी रुपयांना ( ७ . ७ अब्ज डॉलरकिंवा ५ . ४४ अब्ज युरो ) खरेदी करीत असल्याची घोषणा केली . या व्यवहारामुळे ' मायक्रोसॉफ्ट ' ला ' नोकिया ' च्या जवळपास सर्वच पेटंटवर दावा सांगता येणार असून ,जगभरातील ३२ हजार कर्मचाऱ्यांची फौज दिमतीला मिळणार आहे . शिवाय ' मायक्रोसॉफ्ट ' ला आगामी  दहावर्षांपर्यंत ' नोकिया ' हे ब्रँडनेम वापरण्याचा परवानाही मिळाला आहे . नव्या व्यवस्थापनामुळे ' नोकिया ' चाबाजारहिस्सा वाढल्यास ते कायम ठेवण्याचा अथवा भविष्यात ' मायक्रोसॉफ्ट स्मार्टफोन्स ' या नावाने  हँडसेटबाजारात उतरविण्याचा हक्क मात्र बिल गेट्स यांच्या मालकीच्या कंपनीने राखून ठेवला आहे . या व्यवहारामुळे स्मार्टफोन उद्योगात प्रचंड खळबळ माजली नसली तरी बाजारातील आघाडीच्या ' अॅपल '  च्या 'आयओएस ' आणि ' गुगल ' च्या ' अँड्रॉइड ' या ' ऑपरेटिंग सिस्टीम ' ना टक्कर देण्यासाठी ' मायक्रोसॉफ्ट ' ने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे . स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी ' नोकिया ' ने ' विंडोज ' या  ऑपरेटिंग सिस्टीमचा आधार घेतला खरा ; पण हे प्रयत्न तोकडे पडले .

गुगलची ‘वेझ’क्रांती

जंगलामध्ये रस्ता हरवला, तर मदतीसाठी पूर्वी आरडाओरडा केला जायचा. माहितगार व्यक्ती होकायंत्राने दिशा शोधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायच्या . इंटरनेट क्रांतीनंतर मॅपचा आधार घेऊन दिशा शोधल्या जाऊ लागल्या . आपण नेमकेकोठे आहोत आणि कुठे जायचे आहे , याचे मार्ग मोबाईलवर दिसू लागले आणि अवघड वाटणारा प्रवास सोपा झाला . या सर्व तंत्रज्ञानाचे जनक म्हणजे गुगल , अॅपल , फेसबुकयांसारख्या कंपन्यांनी पुरवलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर अक्षरशः कोट्यवधी लोक करतात.' गुगल ' ने या मॅपसंदर्भात नुकतेच एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे . त्यामुळे मॅपिंगच्या क्षेत्रातील चेहरामोहराच बदलला जाईल . मूळचे इस्रायलचे असणारे ' वेझ ' तंत्रज्ञान खरेदी करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे . १ . ३ अब्जडॉलरचा करार गुगलने यासाठी केला आहे . गुगलच्या यूजर्सची जगभरातील संख्या पाहिली , तर ' वेझ ' हीगुगलसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच ठरण्याची शक्यता आहे . यापूर्वी अब्जावधी डॉलरचा करार गुगलने तिघांबाबततच केला आहे . त्यात यू - ट्यूबचाही समावेश आहे . इस्रायलमधील भरघोस यशानंतर वेझ हे तंत्रज्ञान चार वर्षांपूर्वीच अमेरिकेत आले आहे . मोटारींना ट्रॅफिकमधून मार्ग दाखवणे , स्पीडलेन सांगणे , शॉटकट कुठेआहेत , अपघात कुठल्या रस्त्यावर झाले आहेत , धोक्याचे रस्ते कुठले आहेत , या सर्वांची कल्पना ड्रायव्हरलादेण्याचे काम ' वेझ ' करते . मोठे करार १५ वर्षांच्या इतिहासात गुगलने आतापर्यंत केलेल्या सर्वांत मोठ्या किमतीच्या २४० करारांपैकी ' वेझ ' चा क्रमांकचौथा लागतो . मोटोरोला मोबिलिटी - १२ . ४ अब्ज डॉलर , डबल क्लिक - ३ . २ अब्ज डॉलर आणि यू - ट्यूब- १ . ७६ अब्ज डॉलर हे तीन करार यापूर्वी केले आहेत . यू - ट्यूबसारख्या साइटचे भारतातील यश पाहता आगामी काळात वेझ तंत्रज्ञानही येथे झपाट्याने वापरले जाईल , याची खात्री वाटते . वेझचा १९० देशांमध्ये वापर ' वेझ ' ने सांगितले आहे , की मॅपिंग तंत्रज्ञान १९० देशांमध्ये वापरले जाते . ट्रॅफिक जॅम , जॉब आणि इतरठिकाणी जाण्यासाठी सर्वांत जलद उपलब्ध रस्ता शोधण्यासाठी याचा वापर केला जातो . कंपनीचे ७० हजारसदस्य नकाशांचे संपादन करण्यावर काम करतात . नकाशांखेरीज विविध टिप्सही यामध्ये दिल्या जातात . वेझच्या आगमनाने गुगलचीही दोन वर्षांपूर्वीची ' प्लस ' नावाची सोशल नेटवर्किंग सर्व्हिस अपडेट होण्याची शक्यता आहे .' गुगल ' चे भारतातील यूजर पाहता मॅपिंगच्या सुविधेचा येथेही मोठ्या प्रमाणावर केला जाईल . आपल्या देशातील वाहतुकीची समस्या पाहता ' वेझ ' मुळे ती दूर होईल , असे वाटत नाही ; पण दूरच्या प्रवासासाठी ,महामार्ग ठिकाणी या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाला , तरी नव्याने फिरणाऱ्यांच्या अनेक समस्या सुटण्यास हातभार लागेल , असे वाटते .

‘गुगल ग्लास’ घातक! खासगी जीवनामध्ये हस्तक्षेप होण्याची भीती

वेगवेगळ्या ' थीम्स ' नी नेटिझन्सना कायम आकर्षित करणाऱ्या ' गुगल ' ने ' गुगल ग्लास ' च्या माध्यमातून इंटरनेटच्या जमान्यामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे. आपल्या कामावरील लक्ष विचलित होऊ न ...

Page 1 of 2 1 2
ADVERTISEMENT
error: Content is protected!