मायक्रोसॉफ्टच्या नवीन आउटलूक मेलला केवळ सहा तासात एक दशलक्ष नवीन वापरकर्ते मिळाले आहेत

हॉटमेलच्या नामकरणानंतर नवख्या आउटलूक.कॉम ला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या सहा  तासात तब्बल एक दशलक्षहून अधिक लोकांनी साइन अप (नवीन सभासद होण्याला Sign Up असे म्हणतात )केलं  आहे.  जीमेलसारख्या व काही अधिक सुविधायुक्त अशी ही सेवा सोशल नेटवर्किंगला(Facebook, Twitter, LinkedIn, Google +, Skype ) अधिक जवळची  म्हणजे ह्या सेवेतच वापर करण्याची मजा मिळवून देते.
ह्याचा मुख्य भाग अधिक सुटसुटीत केल्यामुळे त्यावर 30% जास्त ईमेल दिसतात.
मायक्रोसॉफ्टने नवीन उत्पादनांचा धडाका लाऊन दिला आहे.  प्रथम सर्फेस टॅब्लेट , ऑफिस 2013,विंडोज 8,आता आउटलूक.कॉम.  अॅपलच्या वाटचालीला हे आव्हान किती प्रमाणात अडसर ठरू शकते ते बघण्यासाठी सहा सात महीने तरी वाट पहावी लागणार
Official Tweet :
Exit mobile version