निंबुझ मेसेजरचे (Nimbuzz) वापरकर्ते 100 दशलक्षांवर

तात्काळ मेसेजिंग (Instant Messaging )साठी प्रसिद्ध असणार्‍या निंबुझने/निंबझने   (Nimbuzz) गुरुवारी जाहीर केले की त्यांनी 100 दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पा पार केला आहे.
मोबाइल आणि वेब संदेशवहनाच्या क्षेत्रातील सर्वाधिक मोठ्या 20 प्लॅटफॉर्ममध्ये अग्रस्थानी राहण्याचा मन अशाप्रकारे त्यांना मिळाला आहे. (त्यांचे प्रतिस्पर्धी What’s App, ब्लॅकबेरी मेसेजर  , स्काइप , अॅपलचा iChat आणि याहू मेसेजर ). निंबुझ नेदर्लंडमध्ये प्रथम चालू करण्यात आली होती.
ही एकच अशी सेवा आहे जी तब्बल 25 भाषांचा पर्याय देते. सुमारे 80 देशात निंबुझ वापरले जाते.  त्यांच्या एकूण वापरकर्त्यापैकी 17 % भारतातून तर 5% यू.एस.मधून आहेत. सर्वाधिक नोकियाच्या मोबाइलवर आणि नंतर अॅन्ड्रोइडवरती त्यांचे यूजर आहेत.

डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा : Nimbuzz 

Exit mobile version