हे आकर्षक मोबाईल बनू शकतात आयफोन-5 साठी अडथळा

PICS: हे आकर्षक मोबाईल बनू शकतात आयफोन-5 साठी अडथळाज्‍या आयफोनची जगभरातून वाट पाहण्‍यात येत होती. तो मोठया प्रतिक्षेनंतर लॉंच झाला. मात्र तो प्रत्‍यक्षात खरेदी करण्‍यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मोबाईलप्रेमींना आयफोन-5, 21 सप्‍टेंबरपासून बाजारात उपलब्‍ध होईल. या नव्‍या फोनची बॅटरी आधीच्‍या आयफोनपेक्षा जास्‍त क्षमतेची असेल. आणि याचे खास वैशिष्‍ट म्‍हणजे यामध्‍ये 4 जीची सुविधा उपलब्‍ध आहे. 
आयफोन-5 बाबतीत अनेक शक्‍यता वर्तवण्‍यात येत असल्‍या तरी बाजारात यांच्‍याशी स्‍पर्धा करण्‍यासाठी इतर मोबाईल कंपन्‍यांनी आपल्‍या बाह्या सरसावल्‍या आहेत. यामध्‍ये सर्वात महत्‍वाची भूमिका निभावणार आहे ती सॅमसंग कंपनी. सॅमसंग एस 3 बाजारात पूर्वीपासूनच उपलब्‍ध आहे. आणि त्‍यांनी आपले स्‍थानही चांगलेच पक्‍के केले आहे. एस 3 शिवाय SONY XPERIYA T, मायक्रोसॉफ्ट विंडोज 8 सारखे स्‍मार्टफोन आयफोन- 5च्‍या प्रगतीत अडथळा बनू शकतात. 

सॅमसंग गॅलेक्‍सी s 3 ची सध्‍या बाजारात मोठी चर्चा सुरू आहे. लॉंचिंग झाल्‍यापासून त्‍यांनी 100 दिवसांच्‍या आतच 2 कोटी युनिट्सची विक्रमी विक्री केली आहे. 4.8 इंचीच्‍या HD Super- AMOLED स्‍क्रीनमुळे चांगला अनुभव मिळतो. यातील एस-बीम फिचरमुळे तुम्‍हाला फोटो आणि डॉक्‍युमेंट्स सहज ट्रान्‍सफर करता येतात. कॅमेरा 8 मेगापिक्‍सलचा असल्‍यामुळे छायाचित्रांची गुणवत्ता चांगली मिळते. त्‍याशिवाय या फोनमध्‍ये अनेक वैशिष्‍टे आहेत. याचे ऑलशेअर ऑप्‍शन विविध प्रकारच्‍या गेम्‍ससाठी उपयुक्‍त आहे. यामध्‍ये 1.4.1.4 GHZ चे प्रोसेसर लावण्‍यात आले आहे. बाजारात हा फोन 37,740 रूपयांस मिळतो.

SONY XPERIYA T हा चांगल्‍या गुणवत्तेच्‍या कॅमे-यासाठी ओळखला जातो. या वैशिष्‍टबरोबरच या फोनमध्‍ये 4.55 इंचाची स्‍कॅचप्रुफ टचस्‍क्रीन देण्‍यात आली आहे. या फोनमध्‍ये अँड्राएड 4 आईसस्‍क्रीम सँडविच ऑपरेटिंग सिस्टिम लावण्‍यात आली आहे. याचे ड्युल प्रोसेसर 1.5 Ghzचे आहे. Xperiya T मध्‍ये 1GB रॅम देण्‍यात आली आहे. रिअर कॅमेरा 13 मेगापिक्‍सलचा आहे तर फ्रंट कॅमेरा हा 1.3 मेगापिक्‍सलचा आहे. कनेक्‍टीव्हिटीसाठी या फोनमध्‍ये Bluetooth, Wi-Fi आणि USB सारखे अ‍ॅप्‍स पुरवण्‍यात आले आहेत. फोनमध्‍ये 2 जी आणि 3 जी या दोन्‍ही सुविधा पुरवण्‍यात आल्‍या आहेत.


Sony Xperia Go नावाचा वॉटरप्रूफ मोबाइलसुद्धा सादर केला आहे.

   

Exit mobile version