गुगल आणि सॅमसंगचा अत्याधुनिक लॅपटॉप

मायक्रोसॉफ्टला टक्‍कर देण्यासाठी गुगल आणि सॅमसंग दोन कंपनी एकत्र आल्या आहेत. गुगल आणि सॅमसंगने नुकताच एक हलक्या वजनाचा अत्याधुनिक लॅपटॉप लॉन्च केला आहे. हा लॅपटॉप गुगल क्रोम वेब ब्राउजर ऑपरेटिंग सिस्‍टमवर कार्य करेल. याची किंमतही मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये आहे. 13 हजार 355 रुपये किंमत असलेला लॅपटॉप सहज उपलब्ध होईल. अन्य क्रोमबुक्‍स सारखे यात हार्ड ड्राइव्ह देण्यात आलेला नसल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.अ‍ॅपल कंपनीने सॅमसंगविरुद्ध दाखल केलेली याचिका गुरुवारी लंडनमधील एका कोर्टाने फेटाळली. अ‍ॅपलने सॅमसंगवर ‘गॅलेक्सी टॅब’ची डिझाईन चोरल्याचा आरोप ठेवला होता.
कोर्टाने सुनावणी करताना सांगितले की, सॅमसंग गॅलेक्सी टॅब आणि अ‍ॅपल आयपॅडमध्ये खूप साम्य आहे. परंतु, यात सॅमसंगने कोणत्याही डिझाईनची चोरी केलेली नाही. विशेष म्हणजे हा निर्णय संपूर्ण यूरोपमध्ये लागू राहील, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.  दुसरीकडे, सॅमसंगने कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
गुगल-सॅमसंगचा हलक्या वजनाचा लॅपटॉप लॉन्च!

जगभरात एक अब्ज स्मार्टफोन यूजर्स…
जगभरात स्मार्टफोन वापरणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही संख्या आता एक अब्जवर पोहचली आहे. अमेरिकन संशोधन संस्था  ‘स्ट्रॅटजी एनालिटिक्स’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, स्मार्टफोन उद्योगाला हा टप्पा गाठण्यासाठी तब्बल 16 वर्षे लागली. यात अ‍ॅपल कंपनीने महत्त्वाची भूमिका पार केली आहे. सन 2012 च्या तिसर्‍या तिमाहीत स्मार्टफोन युजर्सची संख्या 1.03 अब्ज झाली आहे.

‘नोकिया कम्युनिकेटर’ हा जगातील पहिला आधुनिक स्मार्टफोन होता. हा स्मार्टफोन सन 1996 मध्ये बाजार दाखल झाला होता. परंतु,  21 सप्टेंबर 2007 रोजी अ‍ॅपलचा आयफोन लॉन्च झाल आणि त्याला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. पहिल्या तीन दिवसात 50 लाखांपेक्षा अधिक आयफोन विक्री झाले होते.  …

Exit mobile version