गॅजेट चार्ज करणारा स्टोव्ह

 मोबाइल किंवा गॅजेटशिवाय वीकेंडला बाहेर जाण्याची कल्पनाही करवत नाही ना? पण निसर्गरम्य वातावरणात लाकडे टाकून स्टोव्हवर स्वयंपाक करत असतानाच तुमचा मोबाइल किंवा अन्य गॅजेटही चार्ज होईल असा एखादा पर्याय दिला तर? तुम्ही लगेच वीकेंडची योजना आखाल! अमेरिकेच्या बायोलाइट कंपनीने असाच एक कॅम्पस्टोव्ह तयार केला आहे. लाकडे किंवा बायोमास जाळून तो स्वयंपाकासाठी भरपूर उष्णता तर निर्माण करतोच, शिवाय यूएसबीद्वारे चार्ज करता येणारे कोणतेही गॅजेट अगदी आरामात चार्ज होईल एवढी वीजनिर्मितीही करतो. सँडी महावादळ आल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये त्याचा यशस्वीपणे वापर करण्यात आला आहे.

पर्यावरणानुकूल  
पेट्रोलियम गॅस किंवा अन्य इंधनाऐवजी जळाऊ लाकूड, कचरा या  अपारंपरिक इंधनावर हा स्टोव्ह चालतो. परिणामी कमीत कमी कार्बन उत्सर्जन होते.
स्वच्छ, सुरक्षित ऊर्जा 
विकसनशील देशांतील कुटुंबांना स्वच्छ, सुरक्षित ऊर्जा देण्यासाठी बायोलाइटने कॅम्पस्टोव्ह तंत्रज्ञान विकसित केले आहे. जोनाथन सेडर, सीईओ

ग्रॅम वजनाचा आहे कॅम्पस्टोव्ह. त्यामुळे तो कुठेही सहजपणे नेता येतो. त्यामध्ये 21 बाय 21 सेंटिमीटर आकाराचे कुकिंग चेंबर आहे. वीजनिर्मितीसाठी वेगळे युनिट आहे. मागणीप्रमाणे वीजपुरवठा करणारे हे उपकरण आहे. 
दशलक्ष लोकांना हरिकेन सँडी महावादळामुळे वीज गुल झाल्यामुळे फटका बसला होता. तेव्हा अमेरिकी लोकांनी बायोलाइट कॅम्पस्टोव्हची क्षमता पारखून पाहिली. त्यांनी स्वयंपाकही केला आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूही चार्ज केल्या. 
दशलक्ष लोकांचे जगभर अकाली मृत्यू होतात खुल्या आगीवर स्वयंपाक करताना भाजून. जगातील अर्धी लोकसंख्या खुल्या आगीवरच स्वयंपाक करते. परिणामी ग्लोबल वॉर्मिंगची समस्या वाढत आहे. या समस्येवर कॅम्पस्टोव्ह हा चांगला पर्याय आहे.
Exit mobile version