मोबाइल झाला सेट : अॅप्स असूनही त्याचं काय करायचं

बाजारातला सगळ्यात भारी फोन आपण हौसेनं घेतो , पणत्याचा वापर मात्र पुरेपूर होत नाही . बऱ्याचदा फोनमध्ये अॅप्स असूनही त्याचं काय करायचं ते कळत नाही . हीअॅप्स जरा समजून घेतली तर , लाइफ और आसान बन सकती है भिडू . एमईटी प्रस्तुत मुंबई टाइम्सकार्निवलमध्ये याच विषयावर सेमिनार झालं . वसईच्या वर्तक कॉलेजमध्ये ही धमाल सेटिंग जुळून आली .यावेळी सर्वांत आधी आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी ठरत असेलेल्या १२ अॅप्सबद्दल विद्यर्थ्यांना माहितीदेण्यात आली , ती अशी .. 



गुगल गॉगल्स 


हे अॅप वापरून आपण आपल्या मोबाइलवरुन फोटोच्या माध्यमातून सर्च करू शकतो . म्हणजे , समजा आपणएखद्या प्रसिद्ध मंदिराचा फोटो घेऊन तो सर्च केला , तर आत्ता आपण असलेल्या ठिकाणापासून तिथे जाण्याचासंपूर्ण मार्ग हे अॅप आपल्याला दाखवतं . इतकंच नव्हे , तर एखाद्या वस्तूचा फोटो जर आपण सर्च केला , तर त्यावस्तूबद्दलची संपूर्ण माहिती आपल्यायला मिळू शकते . 

ड्रॉपबॉक्स 


आपला महत्वपूर्ण डेटा क्लाउड स्टोरेजच्या मदतीने सेव्ह करता येतो तो या अॅपमुळे . हे अॅप प्ले स्टोअरमध्येहीउपलब्ध आहे . यातून स्टोअर केलेला डेटा आपण कधीही आणि कुठेही अगदी मोबाइलमध्ये , लॅपटॉपमध्ये किंवाकम्पुटरमध्ये ओपन करू शकतो . 

शेयर कॉंटॅक्ट्स व्हाया एसएमएस 


फोनमधले कॉंटॅक्ट्स शेअर करायला आपल्याला मदत करतं ते हे अॅप . तेही एसएमएसच्या मदतीने . सध्याबहुतांश मोबाइलमध्ये बिसनेस कार्ड पाठवण्याची सोय नसते , अशा मोबाइलमध्ये हे अॅप खूप उपयुक्त ठरतं . 


एमएक्स प्लेयर 


हे अॅप सगळ्या प्रकारच्या व्हिडिओ फाइल्स प्ले करतो . या अॅपमध्ये ब्राइटनेस वाढवणे , झूम आणि इतर फीचर्सवापरू शकतो . यामुळे आपल्याला फिल्म पाहण्याचा चांगला आनंद लुटता येतो . 

स्कॅन 


हे अॅप QR कोड स्कॅन करायला वापरलं जातं . सध्या विविध जाहिरातींमध्ये QR कोड वापरला जातो . यामुळे आपल्याला जाहिरात आपल्या मोबाइलवर पाहता येऊ शकते . याचबरोबर त्यातील अधिक माहितीही आपल्यालायातून मिळते . 


एव्हेर्नोट 


आयडियाज किंवा आपल्या कामाबद्दलची माहिती सेव्ह करून ठेवण्यासाठी हे अॅप महत्त्वाचं ठरतं . ही माहितीआपण मोबाइल , कम्पुटर असे कुठेही आणि काहीही ओपन करू शकतो . 

झोमॅटो 


हे अॅप तुमच्या एरियामधलं हॉटेल किंवा रेस्टॉरंट आणि मेन्यू कार्ड्स अशा गोष्टी शोधण्यात मदत करतं . हे अॅपजीपीएसचा वापर करून आपल्याला उपयुक्त असं रिझल्ट देतं . 

निंबझ 


हे अॅप सगळ्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममध्ये आहे . या अॅपमधून फेसबुक , हॉटमेल , जीमेलचं अकाउंटवापरता येतं . शिवाय मित्र आणि मैत्रिणीशी चॅटही करता येतं . 


झेझ 


या अॅपमधून वॉलपेपर , रिंगटोन्स , थीम्स आणि इतर गोष्टी फ्रीमध्ये डाउनलोड करता येतात . 


वायबर 


हे अॅप फ्री मेसेज आणि कॉल करण्यासाठी वापरलं जातं . २जी , ३जी आणि वायफायचा वापर करून फ्री कॉलसाधता येतात . हा कॉल किंवा मेसेज फक्त ‘ वायबर टू वायबर ‘ साधता येतो . फेसबुक आणि इतर सोशलसाइट्सही इंटेग्रेटेड आहेत . ज्यामुळे कॉन्टॅक्स अपडेट होतात . 


ट्रू – कॉलर 


ही एक ग्लोबल फोन डिरेक्टरी आहे . या अॅपमध्ये फेसबुक , लिंकडीन आणि इतर सोशल साइट्सचं इंटेग्रेशन आहे. जेणेकरून कुठलाही कॉन्टॅकट ऑटोमॅटिकली डिटेक्ट होऊन नाव आणि पत्ता दाखवतो आणि कॉंटॅक्ट्समध्ये सेव्हहोतो . याचा ड्रॉबॅक एकच आहे , तो असा की अजून इथे फक्त वोडाफोनचे नंबर डिटेक्ट होतात . 


बर्थ डे 


वाढदिवस विसरणाऱ्यांसाठी उत्तम अॅप . रिमाइंडरसारखं हे अॅप वापरता येतं . फेसबुकशी इंटिग्रेटेड होऊन ,सगळ्या मित्रांचे वाढदिवस आपल्याला एक दिवस आधीही लक्षात येऊ शकतात 


बेसिक टूल्स 


बेसिक टूल्स हे सध्या सर्वच फोन्समध्ये उपलब्ध असतात . त्यात कॅलेंडर , रिमाइंडर , बॅकप मोबाइल डेटा , बॅटरीआणि डिसप्लेचा प्रॉपर वापर , आणि वायफाय , ब्लूटुथ , जीपीएस असे बेसिक टूल्स असतात . त्याचा वापर कसाकरावा याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली . 


मोबाइल ठेवा सुरक्षित 


सध्या आपले सर्व मोबाइल इंटरनेटशी कनेक्ट असतात . यामुळे त्याची सुरक्षा ही खूप महत्वाची आहे . यामुळेमोबाईल सिक्युरिटीबाबत दक्ष राहणं गरजेचं आहे . मोबाइलमधून आपण पैसे ट्रान्स्फर करणे , बँक बलेन्सतपासणे हे सर्व करत असतो यामुळे मोबइल सुरक्षित असणं खूप महत्वाचं आहे . मोबाइल सुरक्षित करण्यासाठीअनेक प्रकारचे अँटिव्हायरस उपलब्ध आहेत . हे अँटिव्हायरस आपल्याला वेळोवेळी सावध करत असतात . यामुळेआपण आपला मोबाइल सिक्युअर ठेऊ शकतो . याचबरोबर ब्लूटूथ कनेक्ट करतानाही आपल्याला काळजी घेणंगरजेचं आहे . तो कनेक्ट करत असताना येणारा सिक्युरिटी कोड दरवेळी वेगवेगळा टाकावा . Lookout, Trustgo, Avast!, Netqin, etc are famous antiviruses for mobiles


Exit mobile version