यूट्यूबचा नवा हिरो

सामाजिक संदेश देणारा कुठलाही व्हिडीओ यूट्यूबवर लोकप्रिय होऊ शकतो ? होय… ‘ गंगनम ‘, ‘ कोलावेरी ‘ या टाइमपास व्हिडीओजनंतर ‘ टॉक इट आऊट ‘ हा असाच एक व्हिडिओ यूट्यूबवर सध्या हिट झालाय. एका आठवड्यात त्याला तब्बल १५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. 


‘ कोलावेरी डी ‘, ‘ गंगनम स्टाईल ‘ हे फक्त टाइमपास म्हणून झालेले व्हिडीओज यूट्यूबवर तुफान लोकप्रिय ठरले. यू ट्यूबवर सध्या ‘ टॉक इट आऊट ‘ हा व्हिडीओ तुफान लोकप्रिय होतोय. या व्हिडीओने अवघ्या एका आठवड्यात १५ लाख ८ हजार १८२ व्ह्यूज मिळवले आहेत. इतकंच नव्हे तर अवघ्या २४ तासांत एक हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. 


या व्हिडीओचा विषय वेगळा आहे. भारतातली लोकशाही आणि समाज मनातली त्यावरची चर्चा गाण्याच्या स्वरुपात मांडण्याचा यशस्वी प्रयत्न अभय सिंग या तरुणाने केला आहे. प्रत्यक्षात ही ‘ इंडियन डिबेट युनियन ‘ ची जाहिरात आहे. यामधून भारतात डिबेटला किती महत्त्व आहे हे दाखवण्यात आलं आहे. जगभरात विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या काही भारतीय व्यावसायिकांनी एकत्र येऊन इंडियन डिबेट युनियनची स्थापना केली आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा केली जाते. या युनियनच्या प्रमोशनसाठी एक जाहिरात तयार करायची होती. या जाहिरातीमधून मनोरंजनाबरोबरच कही अर्थपूर्ण आयश मला द्यायचा होता , असं अभयने ‘ मुंबई टाइम्स ‘ शी बोलताना स्पष्ट केलं. 


Video Link : >>>>>>> Click Here <<<<<<<<<

व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही यू ट्यूबचा वापर करायचं ठरवलं. या व्हिडीओला इतक्या हिट्स मिळतील अशी अपेक्षा नव्हती. मात्र , त्याहीपेक्षा मला या गोष्टीचा जास्त आनंद आहे की यावर ऑक्सफर्ड युनियन, टूनिशिया यूथ लीडर अशा विविध ठिकाणांहून प्रतिक्रिया आल्या आहेत , असंही अभय सांगतो. या व्हिडीओचं चित्रीकरण आणि गाण्याचे बोल यांचं विशेष कौतुक करण्यात येतंय. यामुळेच हा व्हिडीओ जगभरातल्या लोकप्रिय यू ट्यूब व्हिडीओजच्या यादीत जाऊन बसला आहे. यातून , केवळ नाचायला लावणारे व्हिडीओजच नव्हे तर काही सामाजिक संदेश देणारे व्हिडीओजही लोकांना आवडतात हे समोर आलं आहे.

Exit mobile version