MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी एअरबॅग

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 3, 2013
in स्मार्टफोन्स
Smart-Phone.jpgस्मार्टफोनमध्ये टचस्क्रीनचे प्रमाण सर्वाधिक आहे. टचस्क्रीन हा नाजूक 
प्रकार आहे. त्यामुळे फोन पडल्यास स्क्रीन फुटण्याचा धोका अधिक 
असतो ; तसेच फोनमध्ये बिघाड होण्याचा संभवही अधिक असतो. 
यावर उपाय योजण्यासाठी आणि स्मार्टफोन अधिक टिकाऊ 
बनविण्यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. अमेरिकेतील अॅमेझॉन या 
टेक्नॉलॉजी कंपनीने एअरबॅगसाठी मोशन सेन्सर टेक्नॉलॉजी विकसित 
केली आहे. यामुळे स्मार्टफोन , टॅब्लेट , कॅमेरा अशा वस्तू पडल्यावरही
 सुरक्षित राहू शकतात. 

आपल्या रोजच्या जीवनात मोबाइलचे महत्त्व वाढतच चालले आहे. 
त्यात टॅबलेटची भर पडत आहे. पूर्वी मोबाइल हे फक्त कम्युनिकेशनचे
 साधन होते. सध्याही त्याचा प्रमुख उपयोग तोच असला तरी , या 
माध्यमातून कम्युनिकेशनची अन्य साधनेही वापरता येतात. साधा मोबाइल ते स्मार्टफोन हा टप्पा
 गाठायला पंधराहून अधिक वर्षांचा कालावधी लागला. पूर्वीचे मोबाइल हँडसेट हे अधिक टिकाऊ
 होते. त्यामुळे हँडेसट खाली पडला तरी डिस्प्ले जाणे , फोन बंदच पडणे हे प्रकार तुलनेने कमी 
होत. फोनमधील फीचर्स मर्यादित असल्याने फोनचे डिझाइनही सध्याच्या तुलनेत कमी आकर्षक
 होते. या काळात मोबाइलचे स्वरूप हे फीचर फोनवरून स्मार्टफोनच्या दिशेने बदलले. आता 
बेसिफ फोन किंवा फीचर फोनच्याऐवजी स्मार्टफोनची विक्री अधिक होऊ लागली आहे. 

कारमध्ये एअरबॅगचा वापर लोकांच्या सुरक्षिततेसाठी केला जातो. तशाच प्रकारची मात्र छोटी 
एअरबॅग फोनचे संरक्षण करणार आहे. फोनसाठी विकसित झालेली सिस्टीम मोशन सेन्सरचा वापर
 करते. स्मार्टफोन खाली पडताना सेन्सरच्या मदतीने फोनमधील छोट्या एअरबॅग उघडतात आणि
 फोन सुरक्षितपणे जमिनीवर पडतो. मोबाइल फोनसाठी अशा प्रकारची सिस्टीम विकसित 
करण्याची कल्पना अॅमेझॉन या कंपनीला सुचली. टॅब्लेट ,मोबाइल फोनला सुरक्षित कव्हर देणारी 
सिस्टीम विकसित केल्याबद्दल कंपनीला पेटंट मिळाले आहे. याबाबत कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस
 यांनी अमेरिकेत पेटंटसाठी अर्ज केला होता. खाली पडताना आघात बसण्यापूर्वी तो किती जोराचा 
असू शकतो याचा अंदाज लावला जातो. त्यामुळे आघात होण्यापूर्वी बचाव सिस्टीम कार्यरत 
होऊन नुकसान कमी होऊ शकते , असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे भविष्यात स्मार्टफोनला
 एअरबॅग फीचर आल्यास आश्चर्य वाटायला नको. अर्थात हे फीचर संबंधित गॅजेटच्या 
सुरक्षिततेसाठीच आहे.
ADVERTISEMENT
Tags: AirbagsAmazonSmartphones
ShareTweetSend
Previous Post

मोबाइलमध्ये प्रोजेक्टर

Next Post

अ‍ॅपल, नोकियाला धोबीपछाड देऊन सॅमसंग पहिल्यांदाच टॉपवर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
अ‍ॅपल, नोकियाला धोबीपछाड देऊन सॅमसंग पहिल्यांदाच टॉपवर!

अ‍ॅपल, नोकियाला धोबीपछाड देऊन सॅमसंग पहिल्यांदाच टॉपवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech