अ‍ॅपल, नोकियाला धोबीपछाड देऊन सॅमसंग पहिल्यांदाच टॉपवर!


अ‍ॅपल, नोकियाला धोबीपछाड देऊन सॅमसंग पहिल्यांदाच टॉपवर!मोबाईल फोन बाजारात गेल्या 14 वर्षापासून प्रथम क्रमांकावर

असलेल्या ब्रॅंड ‘नोकिया’ला कोरियन कंपनी ‘सॅमसंग’ने धोबीपछाड
दिला आहे. संशोधन संस्था ‘आयएचएस’ने सॅमसंगला 2012 चा
 टॉप मोबाइल ब्रॅंड घोषित केले आहे. दुसरीकडे स्मार्टफोन
 मोबाईल मार्केटमध्येही सॅमसंगने अ‍ॅपललाही मागे टाकले आहे.

मोबाईल क्षेत्रातील संशोधन संस्था दरवर्षी याबाबतचे
विश्लेषण करते. त्यानुसार केलेल्या विश्लेषण अहवालात संस्थेने
म्हटले आहे की, मोबाईल बाजारात नोकिया काही वर्षापासून
 कायम प्रथम स्थानावर होती. आता मात्र तिचे अढळ स्थान
 ढळले असून, त्याची जागा आता सॅमसंगने घेतली आहे. जागतिक मोबाईल विक्री बाजारात सॅमसंगने सर्वांधिक २९ टक्के वाटा मिळवला आहे. तो गेल्यावर्षी २४ टक्के होता. इकडे नोकियाची विक्री घटली असून, ३० टक्क्यांवरुन २४ टक्क्यांवर विक्री आली आहे. एका वर्षात नोकियाला जागतिक बाजारातील ६ टक्के वाटा गमवावा लागल्याने त्याच्या शेअरची किंमतही ६ टक्क्यांनी खाली आहे. 
सॅमसंग पहिल्यांदाच टॉपवर- आयएचएसच्या अहवालानुसार, दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने
पहिल्यांदाच वार्षिक उलाढालीत व बाजारातील हिस्सा याबाबत प्रथम क्रमांकावर गेली आहे. 
अ‍ॅपलला टाकले मागे- स्मार्टफोनच्या जगात प्रथम क्रमांकावर असलेल्या अ‍ॅपल कंपनीलाही सॅमसंगने
 मागे टाकले आहे. आयएचएसच्या पाहणीनुसार सॅमसंगने स्मार्टफोनच्या बाजारात आपला
28 टक्के हिस्सा मिळवला आहे. जो 2011 मध्ये 20 टक्के होता. अ‍ॅपलला मागे टाकले असले तरी
त्यांची हिस्सेदारी फक्त 1 टक्क्यांनी घटली आहे. अ‍ॅपलची विक्री 20 वरुन 19 टक्केवर आली आहे. 
Exit mobile version