Tag: Top

अॅपल अॅप स्टोअरवरील २०१८ मधील सर्वोत्तम अॅप्स व गेम्सची यादी जाहीर!

अॅपल अॅप स्टोअरवरील २०१८ मधील सर्वोत्तम अॅप्स व गेम्सची यादी जाहीर!

काही दिवसांपूर्वीच गूगलने प्ले स्टोअरवरील २०१८ वर्षासाठीची सर्वोत्तम अॅप्स व गेम्सची यादी सादर केली होती! त्यानंतर आता अॅपलने त्यांच्या अॅप ...

गूगल इयर इन सर्च : २०१७ मध्ये भारतीयांनी ‘हे’ केलं सर्च!

गूगल इयर इन सर्च : २०१७ मध्ये भारतीयांनी ‘हे’ केलं सर्च!

गूगल या सर्च इंजिनवर रोज आपण बर्‍याच गोष्टीचा शोध घेतो. याची गूगलकडे वेळोवेळी नोंद होते आणि त्यानंतर गूगल आपल्या संबंधित ...

भारतातील हॅकिंग घटले

जगभरात सायबर हल्ल्यांची भीती व्यक्त होत असतानाभारतात मात्र हॅकिंगचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनासआले आहे . जगभरात हॅकिंगचे प्रमाण चीनमध्ये सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहेत . हॅकिंगच्या बाबतीत 'टॉप टेन ' देशांच्या यादीत भारत आठव्या स्थानावर आहे . ' अकामयी टेक्नॉलॉजीस ' या कंपनीने हॅकिंगच्या प्रमाणाबाबत केलेल्या सर्वेक्षणात विविध देशांची धक्कादायकमाहिती समोर आली आहे . जगभरातील एकूण हॅकिंग पैकी ४१ टक्के हॅकिंग हे चीनमध्ये होत असल्याचे निदर्शनासआले आहे . सन २०१२च्या शेवटच्या तिमाहीत झालेल्या हॅकिंगवरून ही आकडेवारी काढण्यात आली असून ,याची कारणमीमांसाही करण्यात आली आहे . चीनमध्ये हॅकर्सचे सर्वात मोठे नेटवर्क असल्याचे सर्वेक्षणात आढळलेआहे . यात काम करणारे काही लोक चीनच्या सैन्यातील असल्याचेही समोर आले आहे . चीन खालोखालअमेरिकेचा नंबर येतो . अमेरिकेत हॅकिंगचे प्रमाण १० टक्के असून , हे प्रमाण आधीच्या तिमाहीपेक्षा तीनटक्क्यांनी कमी झाले आहे . अमेरिकेत सर्वाधिक अनॉनिमस आणि विध्वंसक कारवाया करणारे अॅण्टिसेक लोकअसून , तेथे सायबर हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे . तिसऱ्या क्रमांकावर तुर्कस्तानहा देश आहे . या देशात हॅकिंगचे प्रमाण ४ . ७ टक्के इतके आहे . मागील तुलनेत या देशातील हॅकिंगचे प्रमाणमोठ्या प्रमाणावर वाढले आहे .  रशियाचा क्रमांक चौथा असून , या देशातील हॅकिंगचे प्रमाण ४ . ३ टक्के इतके आहे . तैवान हा देश चीनी हॅकर्सचा नेहमीचाच टार्गेट राहीला आहे . मात्र , या देशाने उभी केलेली सायबर सुरक्षा यंत्रणा चीनी हल्लेखोरांना पुरून उरली आहे . देशातील हॅकिंगचे प्रमाण १२ . ७ टक्क्यांवरून ३ . ७ टक्क्यांवर आले आहे . त्याखालोखाल ब्राझील , रोमानिया या देशांचा नंबर येतो . या खालोखाल आठव्या स्थानी भारताचा क्रमांक येतो . भारतातील हॅकिंगचे प्रमाण हे २ . ३ टक्के इतके आहे . यापूर्वी हे प्रमाण २ . ५ टक्के इतके होते , तर मागील वर्षी ते तीन टक्के इतके होते . देशातील सायबर सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी करण्यात आली असून ,एथिकल हॅकर्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आले आहे . या खालोखाल इटली नवव्या स्थानावर तर हंगेरी दहाव्या स्थानावर आहे . जगातील सर्वात मोठा धोका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायबर क्राइमकडे जगातील सर्व देशांनी विशेष लक्ष पुरविले आहे . यामुळे हल्लेखोरांना हल्ले करणे कठीण होत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे . भारताच्या बाबतीत सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात प्रगत देश म्हणून असे संबोधण्यात आले आहे .

मोबाइल खिलाडी मोबाइल गेम्स

कम्प्युटर गेम्सनी गेमिंग मार्केटमध्ये झालेल्या भरगच्च उलाढालीनंतर आता टॅबलेट्स आणि स्मार्ट फोनमध्ये गेमिंगची लाट सुरू झाली. सरत्या वर्षांत या गेम्सनी ...

पाच हजारांहून कमी किंमतीत शानदार ड्युअल सिम मोबाईल!

पाच हजारांहून कमी किंमतीत शानदार ड्युअल सिम मोबाईल!

सिंगल सिम मोबाईल फोनचा ट्रेंड हळूहळू कमी होतोय. कारण गॅझेटच्या दुनियेत ड्युअल सिम मोबाइलचा चांगलाच बोलबाला झाला आहे. मल्टीमीडिया, टच ...

Page 1 of 2 1 2
ADVERTISEMENT
error: Content is protected!