MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

गुगल मॅप पुन्हा ‘आयफोन’वर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 6, 2013
in ॲप्स
पूर्वी पत्ता विचारायचा झाला , की रस्त्यावरील एखाद्याव्यक्तीला गाठले जायचे . आजही तसे होते पण सध्याच्या युगात पत्ता किंवा एखादे ठिकाण शोधण्याकरिताइंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे … पूर्वी एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे झाल्यास त्या ठिकाणीजायचे कसे ? जवळची खूण काय ? असा तपशील गोळा करावा लागे . मात्र , आता इंटरनेटवर सर्च करायचाअवकाश की तेथे कसे जायचे , जवळचा रस्ता कोणता आदी माहिती काही क्षणांतच मिळते . 



‘ जीपीएस ‘ वर आधारित मोबाइल असल्यास इंटरनेटच्या साह्याने मॅपचे अॅप्लिकेशन सुरू करून संबंधित ठिकाणीपोचता येऊ शकते . कागदावरील मॅपचे थोडक्यात नकाशांचे व्हर्च्युअल रूप सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गुगलनेआपल्या मॅप्सच्या सर्व्हिसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले . अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारितमोबाइल फोनमध्ये गुगलच्या मॅप्सचे अॅप दिलेले असते . नसल्यास ते डाउनलोड करून घेणे उपयोगाचे ठरू शकते. गुगलच्या मॅपच्या आधारे अनेक लोकांनी त्यांची घराचे पत्ते अॅड केले आहेत . त्यामुळे गुगल मॅपवरून संबंधितव्यक्ती कोठे राहते किंवा संबंधित व्यक्तीचे ऑफिस कोठे आहे , हे कळते . मात्र , आयफोन बनविणाऱ्या अॅपलकंपनीने ‘ गुगल मॅप ‘ सुविधा आयफोनवरून काही महिन्यांपूर्वी काढून टाकली होती . अॅपलने स्वतःची मॅपसर्व्हिस सप्टेंबरमध्ये सुरू केल्याने हे पाऊल उचलण्यात आले होते . 


पूर्वी अॅपलच्या आयफोनमध्ये गुगल मॅपचे प्री – लोड अॅप येत होते . ते बंद करण्याच्या कंपनीच्या या निर्णयासग्राहकांकडून तीव्र विरोध झाला . अखेर अॅपल कंपनीने आयफोनवर गुगलची फ्री मॅप सुविधा पुन्हा उपलब्ध करूनदिली आहे . चाळीस देशांत तिचा अॅक्सेस करणे शक्य असल्याचे कंपनीने स्पष्ट केले . गुगलने आकाशातून दिसणारेदृश्य , टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन हे नवे फीचर उपलब्ध केले आहे . ही सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर डाउनलोडच्या बाबतीतही अॅपल अॅप स्टोअरवर गुगल मॅपिंग अॅपला सर्वाधिक मागणी होती . गुगल मॅप अॅपलच्याउत्पादनावर उपलब्ध झाला आहे . यूजर पब्लिट ट्रान्झिट इन्फॉर्मेशन यावर पाहू शकणार आहे ; तसेच लाइव्हट्रॅफिक अपडेटबरोबर स्ट्रीट व्ह्यू फीचरचाही यात समावेश करण्यात आला आहे . यामुळे यूजरना विविध प्रकारचीमाहिती आपल्या गरजेनुसार जाणून घेता येणार आहे . गुगलचे मॅप किती लोकप्रिय आहे , हे अॅपलच्या ग्राहकांच्यामागणीवरून कळू शकते . अॅपल या कंपनीची गुगल ही स्पर्धक कंपनी आहे . मात्र , असे असतानाही यूजरचीमागणी पूर्ण करण्यासाठी अॅपलला पुन्हा ही सर्व्हिस उपलब्ध करून देण्याची दखल घ्यावी लागली आहे . 

ADVERTISEMENT
Tags: AppleAppsGoogleGoogle MapsiOSMaps
ShareTweetSend
Previous Post

नोकिया आशा २०५ व नोकिया २०६

Next Post

व्हॉट अॅन अॅप!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Next Post

व्हॉट अॅन अॅप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech