नोकियाने भारतात लाँच केला सर्वात स्वस्त विंडोज स्मार्टफोन

नोकियाने भारतात लाँच केला सर्वात स्वस्त विंडोज स्मार्टफोनमोबाईल बाजारातील प्रसिद्ध ब्रँड नोकियाने भारतात गुरुवारी दोन मोबाईल लाँच केले. त्यातील एक विंडोज 8 स्मार्टफोन असून त्यांची किंमत १०,५०० आहे.  एका आठवड्यात हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. नोकियाचा सर्वात अँडव्हान्स फोन लुमियाचे सर्वात स्वस्त व्हर्जन आहे. नोकियाने लुमिया 520 (सोबतच्या छायाचित्रातील) आणि लुमिया 720 भारतात लाँच केले आहेत.


लुमिया 520 ला चार इंचाचा स्क्रिन डिस्प्ले आहे.  या फोनमध्ये विंडोज 8 ऑपरेटींग सिस्टिम आहे.  या फोनचा कॅमेरा लुमिया 920 च्या दर्जाचा असून हा फोन पाच रंगामध्ये उपलब्ध आहे. एक गीगा हर्टज् ड्युएल प्रोसेसरवर हा फोन चालतो. यात 512 एमबी रॅम आहे.  याचा कॅमेरा 5 मेगापिक्सल असून ऑटो फोकस आहे. तर, लुमिया 720 मध्ये 6.7 मेगापिक्सलचा कॅमेरा टु स्टेज कॅप्चरसह आहे.

लुमिया 720 मध्येही विंडोज 8 ऑपरेटींग सिस्टिम आहे. याचे दुसरे वैशिष्ट्य याची बॅटरी लाईफ (२००० एमएएच) आहे. याची टच स्क्रिन ग्लोज् घातलेले असताना आणि लांब नखे असल्यावरही ऑपरेट करता येते. हा एक वायरलेस चार्जिंग फोन आहे. यासोबत वायरलेस चार्जिंग कव्हर देखील आहे.

लुमिया 720 ची स्क्रिन 4.3 इंचाची असून त्याचा आयपीएस क्लिअर ब्लॅक डिस्प्ले आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे  लुमिया 720 मध्ये 6.7 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा , आणि 1.3 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात 8 जीबी इंटर्नल स्टोरेज क्षमता आहे ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने 64 जीबी पर्यंत वाढवता येते. 128 ग्रॅम वजनाच्या या फोनमध्ये 512 एमबी रॅम आहे.


नोकियाने भारतात हा फोन लाँच केला असला तरी, त्याची किंमत गुलदस्त्यातच ठेवली आहे.

Exit mobile version