MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

डिसलाइक… फेसबुक..निधनाची बातमीही ‘लाइक ‘ केली जाते ?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 29, 2013
in Social Media
फेसबुक हे व्यक्त होण्याचं साधन झालं आहे. वैयक्तिक आणि आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर इथे मत दिलं जातं. त्या मतांमध्ये जाणवतो तारतम्याचा अभाव , म्हणून निधनाची बातमीही ‘लाइक ‘ केली जाते. 

सोशल नेटवर्किंग साइट्स हा व्यक्त होण्याचं मोठं माध्यम बनून गेल्या आहेत. त्यामुळेच आपल्या ,आपल्या मित्रांच्या आयुष्यात तसंच समाजात घडणाऱ्या घटनांवर इथे मतं व्यक्त केली जातात. मतमतांतरं होतं. वाद झडतात. हे सारं होतं , म्हणूनच ही माध्यमं जिवंत राहातात. इथे इतरांनाही यावंसं वाटतं. फक्त हे सारं करताना तारतम्य सुटतं आहे की काय , असं वाटतं. फेसबुकवर जास्त वाटतं. फेसबुकवर आपल्याला एखादी पोस्ट लाइक किंवा डिसलाइक करता येते. त्यावर कमेंटही करता येते. लाइक किंवा डिसलाइक करणं सोपं आहे आणि त्यामुळेच गडबड होते आहे. एखाद्या दुःखद पोस्टवरही लाइक्स पडतात , तेव्हा आपल्यातलं तारतम्य हरवलं की काय , असं वाटून जातं. ‘ चिंटू ‘ कार प्रभाकर वाडेकर यांच्या निधनाच्या बातमीनंतर ही बाब प्रकर्षानं दिसली. ही बातमी ‘ लाइक ‘ करणाऱ्यांना त्यातून वेगळं काही सुचवायचं नव्हतं. तेही त्या दुःखात सहभागी होते ; पण सहवेदना दाखवण्याची पद्धत अगदीच चुकली. अशा चुका मागे घेता येत नाहीत आणि त्यातून नुकसान घडून जातं. 

न समजल्यामुळे 

असं ‘ लाइक ‘ कोणी जाणूनबुजून केलं नाही. ते करणाऱ्यालाही दुःख झालेलं असतं. पूर्वी +१ अशी कमेंट द्यायचे. ही कमेंट ऑर्कुटवर जास्त असायची. फेसबुकनं लाइकची सोय केल्यामुळे ते करणं सुरू झालं. अर्थात , अशा प्रसंगी आरआयपी ही छोटीशी कमेंट टाकता येते. लाइक करणाऱ्यांना लगेचच कमेंटमध्ये कोणीतरी झापलेलंही असतं. हळूहळू असे लाइक्स नक्की कमी होतील. 

– अमृता कुलकर्णी 

गडबड होते 

एक किस्सा सांगतो. मागच्या गणपतीत आमच्या बिल्डिंगमध्ये भजनाचा कार्यक्रम होता. आम्ही सगळे मित्र मागच्या ओळीत बसलो होतो. भजनं खरंच सुंदर चालली होती. त्या गायकाचं ‘ मैं नहीं माखन खायो ‘ आमच्यातल्या एकाला फार आवडलं आणि तो गायक समेवर येताना यानं खणखणीत शिट्टी मारून दाद दिली. तो गायकही दचकला आणि बाकीचे सगळेच! ‘ मला फार आवडलं , म्हणून मी शिट्टी मारली ,’ असं त्याचं प्रामाणिक स्पष्टीकरण होतं. त्याची दाद मनापासूनचही होती. पद्धत चुकली. ‘ लाइक ‘ च्या बाबतीत तेच होत असावं. दुःखद घटनांच्यावेळी आपली सहानुभूती दाखवायची असते. कमेंट करता येत नाही किंवा सुचत नाही. त्यामुळेच चटकन लाइक केलं जात असावं. 

– योगेश जाधव 

सवय झाली आहे 

हल्ली फेसबुकवर कोणत्याही गोष्टीला ‘ लाइक ‘ करणं ही सवय झाली आहे. दिसलं लिखाण की कर लाइक , फोटो पाहिला की कर लाइक अशी मनोवृत्ती झाली आहे. जरासा मोकळा वेळ मिळाला , की मोबाइल किंवा पीसीवर फेसबुक सुरू करायचं आणि दिसेल त्या गोष्टीला पटापटा लाइक करायचं हा दिनक्रमाचा महत्त्वाचा भाग झालाय. हे अर्थातच चुकीचं आहे. ‘ लाइक ‘ करताना किमान भान बाळगलंच पाहिजे. काहींना असंही वाटतं , की आपण इतरांच्या फोटो- कमेंट्सना लाइक केलं म्हणजे ते ही आपल्या कमेंटना लाइक करतील. म्हणूनसुद्धा ढोबळपणे लाइक केलं जातं. मला वाटतं ,प्रत्येकानंच असं लाइक करताना थोडंतरी तारतम्य बाळगलं पाहिजे. 

कुणाल वंजारे

ADVERTISEMENT
Tags: FacebookNetworkingSocialSocial Media
ShareTweetSend
Previous Post

ऑनलाइन गुराढोरांची खरेदी-विक्री OLX AND Quickr

Next Post

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

June 2, 2024
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Community Notes India

X (ट्विटर) वरील Community Notes आता भारतात उपलब्ध!

April 4, 2024
Next Post

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech